काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 06:45 PM2019-03-24T18:45:37+5:302019-03-24T18:48:07+5:30

धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती.

Lok Sabha Election 2019 Congress replaced Chandrapur's candidate, | काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात

Next

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रपूरमधील उमेदवार काँग्रेसकडून बदलण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरेश धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.



 

आयाधी काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली होती. धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच लोकसभेची उमेदवारी काँग्रेसकडून नाकारली होती. परंतु राज्यातील काँग्रेस नेत्याच्या नाराजीनंतर काँग्रेसच्या केंद्रीय समितीने चंद्रपूर येथील उमेदवार बदलला आहे.

दरम्यान हिंगोली मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर युती होणार नाही, असे समजून त्यांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ऐनवेळी युती झाल्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली. दरम्यान काँग्रेसने विद्यमान खासदार राजीव सातव यांना डावलून ऐनवेळी वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Congress replaced Chandrapur's candidate,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.