मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रपूरमधील उमेदवार काँग्रेसकडून बदलण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरेश धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
आयाधी काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली होती. धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच लोकसभेची उमेदवारी काँग्रेसकडून नाकारली होती. परंतु राज्यातील काँग्रेस नेत्याच्या नाराजीनंतर काँग्रेसच्या केंद्रीय समितीने चंद्रपूर येथील उमेदवार बदलला आहे.
दरम्यान हिंगोली मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर युती होणार नाही, असे समजून त्यांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ऐनवेळी युती झाल्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली. दरम्यान काँग्रेसने विद्यमान खासदार राजीव सातव यांना डावलून ऐनवेळी वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.