मुंबई - भाजपचा जळगावचा उमेदवार हा हफ्तेखोर आहे, अवैध धंदे त्याच्या नावावर आहेत अशा हफ्तेखोरांच्या हाती जळगावची सत्ता द्याल का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. महाआघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर अप्पा यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे मुंडे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
तुमचे एक मत केवळ एका जिल्ह्याच्या, उमेदवाराचे भवितव्य ठरवणारे नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची हे ठरवणारी निवडणूक असल्याचे मुंडे यांनी सांगितले. भाजपचे जळगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यावर मुंडे यांनी जहरी टीका केली. जळगाव येथील भाजप उमेदवार हा हफ्तेखोर आहे, त्याच्या नावावर अवैध धंदे चालतात. त्यामुळे हफ्तेखोरांच्या हाती जळगावची सत्ता द्याल का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.देशात सध्या लाट नाही. महाआघाडीचे वादळ आहे. या वादळात कमळाच्या पाकळ्या अशा उडून जातील की अमित शाह आणि मोदी बसले तरी त्यांना पाकळ्या मोजता येणार नाही इतकी वाईट अवस्था सध्या भाजपची आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याची आज सांगता होत आहे. महाआघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर अप्पा यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे मुंडे यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.