मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी भाजपा-शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या दोघांनाही अद्याप जागावाटपास अंतिम स्वरुप देता आलेले नाही. दोघांचाही घोळ कायम आहे. युती कागदावरच झाली; आघाडी तर कागदावरही उतरू शकलेली नाही.युतीमध्ये भाजपा २५ आणि शिवसेना २३ जागा लढणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, भाजपाच्या जागा कोणत्या आणि शिवसेनेच्या कोणत्या हे अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. पालघरची जागा शिवसेनेकडे जाणार असे खात्रीलायकरीत्या म्हटले जात असले तरी त्या बाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. साताराची जागा शिवसेनेकडून भाजपाकडे जाईल का हे ठरलेले नाही.युतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीची जागा लढविली होती. रामदास आठवले यांच्या रिपाइंला साताराची जागा देण्यात आली होती. यावेळी हे दोन्ही पक्ष प्रतीक्षेत आहेत. गेल्यावेळी एनडीएमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा अशा दोन जागा देण्यात आल्या होत्या. आता शेट्टी एनडीएमधून बाहेर पडले आहेत.आघाडीमध्ये तर काँग्रेस किती जागा लढणार आणि राष्ट्रवादी किती लढणार या बाबतचा आकडादेखील जाहीर झालेला नाही. कोण कोणत्या जागा लढणार हे अनिश्चित आहे. काही जागांच्या अदलाबदलीवरून वाद कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगले आणि बुलडाणा अशा दोन जागांची महाआघाडीत मागणी केली आहे. बुलडाणा राष्ट्रवादीकडे आहे.युतीबाबतचे प्रश्न१) भाजपा आणि शिवसेना नेमके कोणत्या जागा लढणार?२) भाजपा-शिवसेना व्यतिरिक्त असलेल्या मित्रपक्षांनाकिती आणि कोणत्या जागा देणार?आघाडीबाबतचे प्रश्न१) काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमके कोणत्या जागा लढणार?२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेणार की नाही?३) अॅड.प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत जाणार का?लोकसभा २०१४ : एक दृष्टिक्षेपभाजपालढविलेल्या जागा- २४जिंकलेल्या जागा- २३मतांची टक्केवारी- २७.३२शिवसेनालढविलेल्या जागा- २०जिंकलेल्या जागा- १८मतांची टक्केवारी- २०.६काँग्रेसलढविलेल्या जागा- २६जिंकलेल्या जागा- २मतांची टक्केवारी- १८.१राष्टÑवादी काँग्रेसलढविलेल्या जागा- २१जिंकलेल्या जागा- ४मतांची टक्केवारी- १५.९
Lok Sabha Election 2019: निवडणुका जाहीर; तरी आघाडी, युतीमधील जागांचा घोळ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 5:23 AM