शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

महाराष्ट्राच्या ४८ पैकी ३३ लोकसभा मतदारसंघांतील लढती ठरल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:55 PM

शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातही राजकीय धुळवड जोरात सुरू आहे.तिकिटासाठी रांगा लावून उभे असलेले नेते, तिकीट न मिळाल्यास बाजूच्या 'विंडो'वर जात आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाला वेग आला आहे. महाराष्ट्रातही राजकीय धुळवड जोरात सुरू आहे. तिकिटासाठी रांगा लावून उभे असलेले नेते, तिकीट न मिळाल्यास बाजूच्या 'विंडो'वर जात आहेत. त्यामुळे तिथल्या रांगेतील लोक नाराज होत आहेत. काही जण ही 'मन की बात' उघडपणे बोलून दाखवत आहेत, काही जण कुजबुजत आहेत, तर काहींची आतल्या आत घुसमट होतेय. लोकसभा निवडणुकीत 'काँटे की टक्कर' असेल ती युती आणि आघाडीमध्येच. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांपैकी ३३ ठिकाणच्या लढती निश्चित झाल्या आहेत. कोणते आहेत हे मतदारसंघ आणि कोण आहेत तिथले उमेदवार, याची एक यादी... 

१. नंदुरबार डॉ. हीना गावित (भाजपा) वि. के. सी. पाडवी (काँग्रेस)

२. धुळेडॉ. सुभाष भामरे (भाजपा) वि. कुणाल पाटील (काँग्रेस)

३. जळगाव स्मिता वाघ (भाजपा) वि. गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)

४. बुलडाणा

प्रतापराव जाधव (शिवसेना) वि. डॉ राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)

५. वर्धा रामदास तडस (भाजपा) वि. अॅड. चारुलता टोकस (काँग्रेस)

६. नागपूर नितीन गडकरी (भाजपा) वि. नाना पटोले (काँग्रेस)

७. गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजपा) वि. डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)

८. चंद्रपूरविनायक बांगडे (काँग्रेस) वि. हंसराज अहिर (भाजपा)

९. यवतमाळ -वाशिम

माणिकराव ठाकरे (काँग्रेस) वि. भावना गवळी (शिवसेना)

१०. परभणी राजेश विटेकर (राष्ट्रवादी) वि. संजय जाधव (शिवसेना)

११. जालनारावसाहेब दानवे (भाजपा) वि. विलास औताडे (काँग्रेस) 

१२. औरंगाबाद चंद्रकांत खैरे (शिवसेना) वि. सुभाष झांबड (काँग्रेस)

१३. दिंडोरी धनराज महाले (राष्ट्रवादी) वि. डॉ. भारती पवार (भाजपा)

१४. नाशिकसमीर भुजबळ (राष्ट्रवादी) वि. हेमंत गोडसे (शिवसेना)

१५. भिवंडी कपिल पाटील (भाजपा) वि. सुरेश टावरे (काँग्रेस)

१६. कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना) वि. बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)

१७. ठाणे राजन विचारे (शिवसेना) वि. आनंद परांजपे (राष्ट्रवादी)

१८. उत्तर मध्य मुंबईपूनम महाजन (भाजपा) वि. प्रिया दत्त (काँग्रेस)

१९. दक्षिण मध्य मुंबई

राहुल शेवाळे (शिवसेना) वि. एकनाथ गायकवाड (काँग्रेस)

२०. मुंबई दक्षिण मिलिंद देवरा (काँग्रेस) वि. अरविंद सावंत (शिवसेना)

२१. रायगड अनंत गीते (शिवसेना) वि. सुनील तटकरे (राष्ट्रवादी)

२२. मावळपार्थ पवार (राष्ट्रवादी) वि. श्रीरंग बारणे (शिवसेना)

२३. बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. कांचन कुल (भाजपा)

२४. शिरूरशिवाजी आढळराव पाटील (शिवसेना) वि. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)

२५. अहमदनगरडॉ. सुजय विखे (भाजपा) वि. संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

२६. शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना) वि. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)

२७. बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजपा) वि. बजरंग सोनावणे

२८. उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना) वि. राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)

२९. लातूर सुधाकर शृंगारे (भाजपा) वि. मच्छलिंद्र कामंत (काँग्रेस)

३०. सोलापूरसुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) वि. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजपा)

३१. रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना) वि. निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)

३२. हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना) वि. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

३३. कोल्हापूरधनंजय महाडिक (राष्ट्रवादी) वि. संजय मंडलिक (शिवसेना) 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtraमहाराष्ट्रNitin Gadkariनितीन गडकरीSujay Vikheसुजय विखे