शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

खोतकरांचे बंड केले थंड; आता जावयाचे काय ? दानवेंसमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:37 AM

हर्षवर्धन जाधव यांच्या आक्रमक पावित्र्यावर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते.

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जालना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आक्रमक असलेले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे बंड शांत केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे. दानवे यांचे जावई आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तसेच काँग्रसकडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे दानवे यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधीच हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला आहे. होय, मी उभं राहणारच, असे म्हणत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे हर्षवर्धन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी माझी बोलणी झाल्याचेही जाधव यांनी सांगितले.

हर्षवर्धन यांच्या आक्रमक पावित्र्याविषयी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती, त्यावर त्यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते. त्यामुळे आता हर्षवर्धन यांचा पेच दानवे कसा सोडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान खैरे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असून त्यांच्यासाठी दानवे यांना औरंगाबादमध्ये सभा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जावईविरुद्ध सासरे असा सामना रंगणार की, अर्जुन खोतकर यांच्याप्रमाणेच ते जावयाची समजूत काढणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv Senaशिवसेना