शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

राज ठाकरेंचा झंझावात अन् मोदींची बारामतीची सभा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 4:41 PM

स्त वेळापत्रकामुळे मोदींची सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. मात्र राज यांच्या झंझावाती सभेनंतरच मोदींची सभा लांबणीवर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई - २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदाच झाला होता. परंतु, यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भूमिका घेतली आहे. तसेच शनिवारी झालेल्या मेळाव्यात राज यांनी मोदींचा कथित खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला. त्यामुळे मोदींची प्रतिमा महाराष्ट्रात खराब होण्याची शक्यता आहे. त्यातच आता मोदींची बारामती येथे १० एप्रिल रोजी होऊ घातलेली जाहीर सभा लांबवण्यात आली आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मोदींची सभा पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

मनसेच्या मेळाव्यानंतर सध्या माध्यमांमध्ये राज ठाकरे यांच्याच भाषणाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीमधील जाहीर सभा लांबणीवर टाकण्यात आली आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे ही सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. मात्र राज यांच्या झंझावाती सभेनंतरच मोदींची सभा लांबणीवर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचार सभेत सैन्याचा पराक्रम आणि आम्ही सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. राज ठाकरे यांनी हाच धागा पकडून काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांना ऐकवली. त्यात, आपणच सैनिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत होते. त्यामुळे मोदी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी बाब म्हणजे, मोदींच्या बीफ निर्यातीवरील भूमिकेसंदर्भातील क्लिप राज यांनी सर्वांना ऐकवली. त्यामुळे मोदींचा दुटप्पीपणा समोर आल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज यांच्या भाषणांचे महाराष्ट्रातील अनेक वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले होते. त्यामुळे यांच्याविरोधातील अनेक मुद्दे घराघरात पोहोचले आहे. त्यामुळे मोदी महाराष्ट्रात सभा घेण्यास आल्यास, जनतेकडून राज यांनी उपस्थिती केलेले प्रश्न पुन्हा विचारले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. यावर भाजप काय तोडगा काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRaj Thackerayराज ठाकरेBaramatiबारामती