पंतप्रधान मोदी आजही माझे चांगले मित्र : शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:09 AM2019-03-24T10:09:28+5:302019-03-24T10:31:21+5:30
आपण कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तीक विरोध करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही आपले चांगले मित्र असल्याचे शुत्रघ्न सिन्हा यांनी म्हटले.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील शनिधाम मंदिरात पूजा केली. यावेळी सिन्हा यांच्या सोबत त्यांची पत्नी देखील उपस्थित होत्या. दर्शन केल्यानंतर सिन्हा यांनी म्हटले की, आपण कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तीक विरोध करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही आपले चांगले मित्र आहे. सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सिन्हा म्हणाले की, माझ्या मनात मोदींविषयी द्वेष नाही. माझा केवळ त्यांच्या धोरणांना विरोध आहे. तसेच माझं कुणाशी शत्रुत्व नाही. मला राजकारण करायचे नसून समाजासाठी काम करायचे. माझ्यासाठी राष्ट्रहीत सर्वप्रथम असून खरं बोलण्यासाठी मी कधीही घाबरत नाही.
तत्पूर्वी भाजपकडून पटना साहिब मतदार संघातून सिन्हा यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपने येथून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. सिन्हा सोमवारी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता असून काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर ते पटना साहिबमधून काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. मागील काही दिवसांत सिन्हा यांनी सतत भाजपवर टीका केली आहे. तसेच अनेकदा विरोधीपक्ष नेत्यांच्या व्यासपीठावर दिसून आले आहेत. यामुळेच भाजपकडून त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बिहरमध्ये लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून सातव्या टप्प्याचे मतदान १९ मे रोजी होणार आहे. तर मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.