शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 3:46 AM

पक्षांतर्गत बंदी कायद्याचा फटका; काँग्रेस प्रवेश की खासदारकी?

पुणे : राज्यसभेच्या खासदारकीचा उर्वरीत कार्यकाळ गमावण्याची तयारी ठेवून खासदार संजय काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे. राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार असलेल्या संजय काकडे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी जंग जंग प्रयत्न चालवले आहेत. मात्र ही उमेदवारी मिळवण्यासाठी काकडे यांना राज्यसभेच्या खासदारकीवर आधी पाणी सोडावे लागणार आहे.घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘‘पक्षांतरबंदी कायद्यान्वये राज्यसभेत सहयोगी सदस्यत्व स्विकारलेले असेल तर दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येत नाही. एका पक्षाचा सहयोगी सदस्यत्व स्विकारलेला राज्यसभा सदस्य ज्या क्षणी दुसऱ्या पक्षाचे सदस्यत्व किंवा उमेदवारी स्विकारतो, त्या क्षणी त्याची राज्यसभेतील खासदारकी आपोआप रद्द होते.’’ संजय काकडे हे एप्रिल २०१४ मध्ये अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले. काकडे यांची राज्यसभेची दोन वर्षांची मुदत अजून बाकी आहे.पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काकडे यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. ‘‘कॉंग्रेसकडून माझी उमेदवारी निश्चित आहे,’’ असे काकडे यांनी रविवारी (दि. १०) जाहीर केले. या वक्तव्याला चोवीस तास उलटत नाहीत तोवरच काकडे सोमवारी (दि. ११) रात्री अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर पोचले. ‘‘या भेटीमध्ये पक्षात मानसन्मान जपण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काकडे यांना दिले, परंतु पुण्याची उमेदवारी मिळणार नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.काकडे यांचे व्याही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मध्यस्थीने काकडेंची मुख्यमंत्री भेट घडून आली. मात्र या भेटीनंतरही काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचाच पुनरुच्चार केला आहे. त्या परिस्थितीत राज्यसभेची उमेदवारी गमवण्याची तयारी काकडेंना ठेवावी लागणार आहे. लोकसभेवर निवडून जाण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये काकडे यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेकांची भेट घेतली आहे. मात्र यासंदर्भात भाजपाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया व्यक्त करण्यातआलेली नाही. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची उमेदवारी मिळवणे आणि त्यानंतर निवडणूक जिंकणे या अनिश्चिततेची टांगती तलवार डोक्यावर ठेवून काकडे राज्यसभा खासदारकीवर पाणी सोडणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे....पण मुख्यमंत्र्यांशी मैत्री कायमराज्यसभा खासदार होण्यापूर्वी पासून माझे मुख्यमंत्र्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. मी काँग्रेसमध्ये जातो आहे हे सांगण्यासाठीच त्यांची भेट घेतली. भाजपचे प्रदेश पातळीवरील आणि स्थानिक नेत्यांच्या कारभाराला कंटाळून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरची माझी मैत्री कायम राहणार आहे.- संजय काकडेसंभाव्य ‘आयारामां’मुळे काँग्रेस निष्ठावंत चिंतेतउमेदवार लादला जाण्याची भिती : प्रचाराला कोणी बाहेर पडेनालोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेने पुण्यातील अन्य राजकीय पक्षांमध्ये उत्साह सळसळला असला तरी पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसजन मात्र चिंतीत झाले आहेत. पक्षाकडून बाहेरचा उमेदवार लादला जाण्याची खात्रीच त्यांना आता वाटू लागली आहे. त्याचा परिणाम पक्षाच्या प्रचारावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाचे सहयोग खासदार संजय काकडे आणि शेतकरी कामगार पक्ष व संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड हे दोघेही काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मागत आहेत.दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या काँग्रेस नेत्यांच्या भेटी काकडे व गायकवाड यांनी घेतल्या आहेत. आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे काकडे जाहीरपणे सांगू लागले आहेत. काँग्रेसने नव्या, तरूण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्यात आपण बसतो आहोत व पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडून तसे संकेत मिळाले आहेत, असे गायकवाड म्हणत आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी उमेदवारी मागितली आहे. हे सगळेच एकनिष्ठ काँग्रेसजन मानले जातात.निष्ठावंत काँग्रेसजनांनी रितसर ठराव करून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र पक्षाने यांच्यापैकी कोणाच्याच नावावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही ही शंका काँग्रेसजनांना वाटू लागली आहे. पक्षाच्या दुसºया फळीतील, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाºया पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाबरोबर निष्ठावान असलेल्याच उमेदवारी मिळावी असे वाटते. त्यामुळेच बाहेरचा उमेदवार लादला तर फक्त तोंडदेखला प्रचार करण्याची चर्चा आत्ताच काँग्रेस वर्तुळात सुरू झाली आहे. याचा फटका पक्षाच्या प्रचारला बसण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस भवनातून मिळत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sanjay Kakdeसंजय काकडेBJPभाजपाcongressकाँग्रेस