मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि सोशल मीडिया आक्राळविक्राळ शक्तीच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने २०१४ लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून सत्ता स्थापन केले होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने विजय मिळवला होता. परंतु, हे दुधारी शस्त्र आता भाजपवर उलटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नेते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य देत आहेत.
सध्या सोशल मीडियावर भाजपच्या कोणत्याही पोस्टवर जाब विचारण्यात येत आहे. २०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत. एवढंच काय तर नेटकऱ्यांमुळे अनेक भाजप नेत्यांना ट्रोलला सामोरे जावे लागते आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी जनतेत जावून प्रत्यक्ष भेटी-गाठीवर भर देण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे विरोधकांची सोशल मीडिया टीम आता देखील आता सक्रीय झाली आहे. त्यामुळे भाजपच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे.
काँग्रेसही होतय अनेकदा ट्रोल
सध्या सर्वच पक्ष सोशल मीडियावर प्रचार करण्यास प्राधान्य देत आहेत. फेसबुक लाईव्ह, ट्विटर आणि व्हॉट्सएपच्या माध्यमातून नेतेमंडळी मतदारांशी संपर्क साधत असतात. मात्र एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे काँग्रेस देखील अनेकदा ट्रोल झाले आहे. मागील ७० वर्षांत काय केलं असा जाब नेटकरी काँग्रेसला देखील विचारताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया या दुधारी शस्त्राचा वापर उत्तम पद्धतीने करणे सर्वांसाठीच जिकीरीचे ठरत आहे, असच म्हणावे लागले.