मुंबई - सेना-भाजपची विचारधारा समान असल्याने आम्ही एकत्र आलो. मागील २५ वर्षांपासून भगवा घेऊन आम्ही एकत्र राहिलो. युतीची ही २५ वर्षे कशी गेली कळलेच नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी आपल्या भाषणात उद्धव यांनी राम मंदिराबद्दल चकार शब्द उचारला नाही.
शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा लावून धरला होता. 'पहिले मंदिर फिर सरकार'ची घोषणा करत त्यांनी भाजपवर चहुबाजुने टीका केली होती. मात्र गुजरातमध्ये अमित शाह यांचा दाखल करण्यासाठी जाऊन राममंदिराच्या मुद्दावर उद्धव यांनी आपली तलावार म्याने केल्याचे चित्र आहे.
अयोध्या दौऱ्यात राम मंदिरच्या मुद्दावर चार वर्षांपासून झोपलेल्या कुंभकरणाला जाग करण्यासाठी आयोध्येत दाखल झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. भाजप सरकार स्थापन होईल किंवा नाही पण राम मंदिर व्हायलाच हवं अशी मागणी सुद्धा त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र हे सगळं केवळ ढोंग होत का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
गांधीनगर येथील भाषणात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व,भगवा याबद्दल बोलताना सेना-भाजप विचारधारा एकसारखी असल्याचे सांगितले. मात्र आपल्या पूर्ण भाषणात त्यांनी राम मंदिराबद्दल कुठेच उल्लेख केला नाही. त्यामुळे युती होण्याच्या आधी राम मंदिरावर बोलणारे उद्धव यांना निवडणुकीत मात्र विसर पडल्याचे बोलले जात आहे.