व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:51 PM2019-04-05T16:51:45+5:302019-04-05T16:58:35+5:30

जनतेच्या भावनांना हात घालणारे विषय घेऊन महाआघाडीच्या वतीने जाहिरात करण्यात येत आहे. युती सरकारच्या नोटबंदी, उज्ज्वला गॅस, पीक विमा आदी विषयांवरील जाहिराती सध्या टीव्हीवर अधिक दिसत आहेत.

Lok Sabha Election 2019 UPA's emotional attack on the demonization | व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार

व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सोशल मीडिया आणि गुगलवरील जाहिरातीत भाजप आघाडीवर असल्याचे आकडेवारी आली असली तर विरोधक देखील जाहिरातीत मागे नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. महाआघाडीच्या वतीने टीव्ही आणि रस्त्यावर उतरून जाहिराती करण्यात येत आहे.

जनतेच्या भावनांना हात घालणारे विषय घेऊन महाआघाडीच्या वतीने जाहिरात करण्यात येत आहे. युती सरकारच्या नोटबंदी, उज्ज्वला गॅस, पीक विमा आदी विषयांवरील जाहिराती सध्या टीव्हीवर अधिक दिसत आहेत. भाजपकडून घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर महाआघाडीने एकप्रकारे प्रहारच केला आहे.

नोटंबदीच्या निर्णयाविरुद्धच्या जाहिरातीत नोटबंदीमुळे मरण पावलेल्या पित्याच्या मुलीला दाखविण्यात आले आहे. लग्नासाठी बाबा पैसा जमा करत होते. असताना अचानक नोटबंदी केली. कसबसा पैसा बँकेत भरला पण तोच पैसा मिळविण्यासाठी एटीएमच्या रांगेत तासनतास थांबावे लागले. त्यातच वडिलांचा मृत्यू झाला. आता या सरकारविरुद्ध शांत बसणार नाही. मी लग्न केले नाही, सरकार जाईपर्यंत लग्न करणार नाही, असा निर्धार जाहिरातीतील मुलगी करतान दिसत आहे. या सरकारला लाज कशी वाटत नाही, असा सवाल या जाहिरातीत करण्यात आला आहे.

२०१४ भाजपकडून देखील अशाच प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. त्याचा मतदारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. आता या जाहिराताचा महाआघाडीला किती फायदा होणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 UPA's emotional attack on the demonization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.