मुंबई - काँग्रेसच्या वतीने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला मुंबई उत्तर मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिलाने दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपली राजकीय कारकिर्द घडविण्यासाठी उर्मिला देखील सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत आहे.
'मी जोशात असून होशात पण असल्याचे सांगत उर्मिलाने आपल्या राजकारणातील प्रवेशाविषयी सांगितले. जोश आणि होश दोन्हींचे संतुलन असणे गरजेचे असतं. जेव्हा आपल्याला संधी दिली जाते, त्यावेळी आपल्याला पुढाच विचार करावा लागतो. तेंव्हा मागे वळून पाहण्यास तुम्हाला वेळ नसतो. उमेदवारी मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्ण प्रयत्नांसह निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचे उर्मिलाने सांगितले. यावेळी उर्मिला अत्यंत आक्रमकेते माध्यमांना प्रतिक्रिया देत होत्या. उर्मिला यांची आक्रमकता पाहून विरोधकांचे टेन्शन वाढणार हे मात्र नक्की.
मला मुंबईकर असल्याचं प्रमापत्र मागू नये, असं उर्मिला यांनी आधीच स्पष्ट केले आहे. देशात सध्या प्रत्येक गोष्टीच प्रमाणपत्र मागितलं जातं. मला विरोधकांपेक्षा मुंबईची अधिक माहित आहे. मी सतत लोकांच्या संपर्कात आहे. आता संपर्क साधण्याचे व्यासपीठ बदलले आहे. जनतेशी आचा समोरासमोर संपर्क येणार असल्याचे उर्मिला यांनी म्हटले. यावेळी विरोधकांना इशारा देताना उर्मिला म्हणाली, आता खरी सुरुवात झाली असून खेळ रंगू द्या पुढे बघुयात काय होतय.
उर्मिला यांना उमेदवारी दिल्यामुळे माझा विजय सुकर झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर उर्मिलाने टोला लागवला आहे. देव करो अन् त्यांच्या मनसारखं व्हावं, अस म्हटले.