मुंबई : राज्यात चार टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. यावर्षी राज्यात तब्बल ४ कोटी १६ लाख महिला मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पुरुष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या झाली आहे. राज्यात एकूण ८ कोटी, ७३ लाख, ३० हजार ४८४ मतदार असून त्यापैकी ४ कोटी ५७ लाख २ हजार ५७९ पुरुष मतदार आहेत.२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. २०१९ मध्ये ती वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके झाले होते. यावर्षी मात्र प्रमाणात १ हजार पुरुषांमागे ९११ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.महिला मंडळांना आले महत्त्वआता विविध ठिकाणची महिला मंडळे प्रचारासाठी उमेदवारांना मदतीची ठरणार आहेत. शिवाय महिलांना आकर्षित करणारे कार्यक्रम घेणे, त्यांच्यासाठी विशेष पाहूणे बोलावणे ही कामे देखील आता महिला उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी मतदारांना करावी लागतील.२००९ लोकसभा निवडणूकपुरुष मतदार- 2,04,78,932महिला मतदार- 1,64,87,190२०१४ लोकसभा निवडणूकपुरुष मतदार- 2,66,22,180महिला मतदार- 2,20,46,720
Lok Sabha Election 2019: राज्यात निर्णायक ठरणार महिलाशक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:47 AM