शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

लोकसभा निवडणूक 2024: अर्ध्या तासाच्या चर्चेत मनसे महायुतीत येण्याची ‘गॅरंटी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 3:28 PM

अमित शाह - राज ठाकरे चर्चा, लोकसभेचा एक मतदारसंघ देण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपचे ‘चाणक्य’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे तसेच त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीचा तपशील उघड झाला नसला तरी राज्यातील महायुतीमध्ये मनसेच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

महायुतीत सामील होऊन मनसे लोकसभेच्या किती जागा लढविणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मनसे दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीनपैकी दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढू इच्छित असल्याचे समजते. शाह-राज यांची बैठक दुपारी साडेबारा वाजता सुरू होऊन अर्ध्या तासात संपली. शाह यांच्या भेटीपूर्वी राज यांची ताज मानसिंह हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर ते शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर राज व अमित ठाकरे लगेच मुंबईला रवाना झाले.

फडणवीस यांच्या पुढाकाराने बैठक? - राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी अमित शाह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी ही थेट-भेट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे भाजपसोबत गेल्याने आमच्या शिवसेनेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मराठी मतांचे विभाजन करून त्याचा फायदा उचलण्याची भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची नेहमीच नीती राहिली आहे. त्याला काही नेते बळी पडत आहेत, पण मतदार बळी पडणार नाहीत.-खा. संजय राऊत, शिवसेना नेते

एक ते दोन दिवसांत येईल अधिक स्पष्टता

अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक होती. मनसेला किती जागांची अपेक्षा आहे हे राज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले. राज यांनी आता २१ मार्चला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली असून या बैठकीनंतर मनसेची पुढची रणनीती आणखी  स्पष्ट होणार आहे. दिल्लीवारीनंतर राज ठाकरे मंगळवारी संध्याकाळी मुंबईत परतले. यानंतर त्यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दक्षिण मुंबईतून तुमची उमेदवारी निश्चित झाली का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज मला म्हणाले की गडचिरोलीतून लढ तर त्यालाही माझी तयारी आहे. कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही याचा निर्णय पक्षप्रमुख घेत असतात.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपा