बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 01:41 PM2024-03-23T13:41:54+5:302024-03-23T13:42:44+5:30

Mahavikas Aghadi Sabha for Supriya Sule इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

Lok sabha Election 2024: In Indapur, Sanjay Raut Target Ajit Pawar, Devendra Fadnavis and BJP | बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

इंदापूर - Sanjay Raut on BJP, Ajit Pawar ( Marathi News ) पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागले तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो. धमक्या द्यायचा, पोलिसांचा वापर करायचा. आम्हाला धमक्या देतो आणि घेतोही. धमक्याचा प्रकार बारामतीत सुरू आहे हा डरपोकपणा आहे. धमक्या फोनवर दिल्या जातात, समोरून दिल्या जात नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई, ठाण्याला यायचंय, रस्ता आमचाच आहे. तुम्ही पवारांना धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय, कुणाला धमक्या देताय? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोक नाही. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते पळून गेले. तुमच्यात हिंमत असेल तर प्रचार करून निवडून येऊन दाखवा. ही लढाई बारामतीची नसून महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई आहे. तुमची दादागिरी, दहशतवाद आणि धमक्या, बारामतीचं कुणी गुजरात करू पाहत असेल तर इथं शिवसेनेचा भगवा ठामपणे उभा राहील असं त्यांनी सांगितले. 

भाजपा पक्ष शिल्लक राहतो का ते पाहाच

तसेच राजकारणातला माणूस विकासावर बोलतो, कामावर मत मागतो. धमक्या देऊन मते मागतात याचा अर्थ त्यांनी विकास केला नाही असा सरळ अर्थ आहे. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ का येते, कारण लोक तुमच्यासोबत नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी २ पक्ष फोडून आलो, पण ४ महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही ईडी, सीबीआयच्या दहशतीवर पक्ष फोडले. उद्या ही यंत्रणा आमच्या हातात येणार आहे त्यामुळे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पाहा असा इशाराही राऊतांनी फडणवीसांना दिला. 

हर्षवर्धन पाटलांनी सोबत यावं 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे आमचे मित्र आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शांत झोप लागत नसेल. पण त्यांना स्वाभिमान असेल, मराठी म्हणून अस्मिता असेल. जर महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरु असताना कुठल्याही मराठी नेत्याने आणि माणसाने शांत झोपू नये. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. तु्म्ही या मातीतले मराठी म्हणून म्हणवण्यास लायक नाही. त्यामुळे मैदानात उतरा, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी. त्यांच्या मनातील अस्वस्थता जाणवते असं सांगत संजय राऊतांनी हर्षवर्धन पाटलांना सोबत येण्याचं आवाहन केले. 
 

Web Title: Lok sabha Election 2024: In Indapur, Sanjay Raut Target Ajit Pawar, Devendra Fadnavis and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.