महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:11 PM2024-02-29T15:11:22+5:302024-02-29T15:12:07+5:30

Lok sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला रेकॉर्डब्रेक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Lok sabha Election 2024: Mahayuti will win a record breaking seat in Maharashtra, MVA's heavy defeat, shocking statistics revealed in the survey | महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा

महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा

काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता नेमका काय कौल देणार याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. २०१९ नंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये झालेली फोडाफोडी, पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन यामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय कलाचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला रेकॉर्डब्रेक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

झी न्यूज-Matrize  च्या या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला तब्बल ४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे भाकित या सर्व्हेमधून करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाराष्ट्रात ४१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१४ मध्ये महायुतीच्या खात्यात ४२ जागा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे खरा ठरल्यास, हा भाजपा आणि महायुतीसाठी महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरणार आहे. 

या सर्व्हेमधील इतर अंदाजांनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ८० पैकी तब्बल ७८ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर देशभरात मिळून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला एकूण  ५४३ जागांपैकी ३७७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला केवळ ९४ जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावाही या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. तर इतर पक्षांना ७२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   

Web Title: Lok sabha Election 2024: Mahayuti will win a record breaking seat in Maharashtra, MVA's heavy defeat, shocking statistics revealed in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.