शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
5
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
6
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
7
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
8
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
9
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
10
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
11
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
12
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
13
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
14
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
15
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
16
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
17
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
19
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?

अपेक्षित मतविभाजन नाही, कापूस, सोयाबीनवरून नाराजी; विदर्भात भाजपची चिंता वाढली

By यदू जोशी | Published: April 21, 2024 6:37 AM

दुसऱ्या टप्प्यातही आव्हान, कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याबाबतची माहिती त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे. 

मुंबई : विरोधी मतांचे अपेक्षित मतविभाजन होताना दिसत नाही आणि त्याचवेळी कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, या मुद्द्यांमुळे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपची चिंता वाढली आहे. शुक्रवारच्या मतदानाची टक्केवारी, कोणत्या भागात किती मतदान झाले याचा आढावा घेण्याचे काम पक्षाकडून सुरू झाले असून, प्राथमिक माहिती फारशी अनुकूल नसल्याचे समजते. 

पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पक्षासाठी जे चिंतेचे मुद्दे समोर आले त्यांची झळ दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अन्य पाच मतदारसंघांमध्ये बसू नये यासाठीचे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे, असे भाजपच्या पक्षसंघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. शेतमालाच्या दरासंदर्भात शेतकरी नाराज असल्याचा फीडबॅक पक्षाकडे आला आहे. कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याबाबतची माहिती त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे. 

कॉंग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा नाहीभाजपला दरवेळी आपल्या विरोधातील मतांच्या विभाजनाचा फायदा होतो. पहिल्या टप्प्यात फार मोठ्या प्रमाणात असे विभाजन होताना दिसत नाही. फक्त भंडारा-गोंदिया (अपक्ष सेवक वाघाये) आणि रामटेक (वंचित समर्थित किशोर गजभिये) यांना मिळालेली मते ही आमच्या पथ्यावर पडतील, असा तर्क या दोन मतदारसंघांतील भाजपचे काही नेते देत आहेत. नागपूरसह सर्वत्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकी दिसली. काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेण्यात भाजपला फारसे यश आलेच नाही, असेही बोलले जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात उणीव भरून काढण्याची तयारीशेतमालाच्या पडलेल्या दराचा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात उचलला. अशावेळी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे जे निर्णय घेतले ते प्रभावीपणे मतदारांसमोर मांडले गेले नाहीत, ही बाबही प्रकर्षाने समोर आली आहे. ही उणीव दुसऱ्या टप्प्यात भरून काढण्याची कसरत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मदतीचे आश्वासन देण्याची तयारीकापूस, सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना पडेल भावात करावी लागली. आता त्यांना क्विंटलमागे मदत करण्यात अडचणी आहेत, तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर लगेच एकरी मदत देण्यासंदर्भातील आश्वासन दुसऱ्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांकडून दिले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसंबंधीचे मुद्दे अधिक प्रभावीपणे प्रचारात समोर आल्याने मोदीकेंद्रित प्रचार अपेक्षित परिणाम साधू शकला नाही, असे काहींचे निरीक्षण आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक