शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मुंबई, कोकणपट्ट्यात महायुतीच ठरली भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:00 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने महाविकास आघाडीपेक्षा चांगली कामगिरी करत अनेक प्रचलित राजकीय समीकरणे, ठोकताळे मोडीत काढले आहेत. मुंबई महानगरात महायुतीने सहापैकी दोनच जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीची मते मविआपेक्षा दोन लाखांनी जास्त आहेत.

- केशव उपाध्येमुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने महाविकास आघाडीपेक्षा चांगली कामगिरी करत अनेक प्रचलित राजकीय समीकरणे, ठोकताळे मोडीत काढले आहेत. मुंबई महानगरात महायुतीने सहापैकी दोनच जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीची मते मविआपेक्षा दोन लाखांनी जास्त आहेत. मुंबईत उध्दवसेना, काँग्रेस एकत्र आल्याने आणि त्यांना फतव्यांचा आशीर्वाद मिळाल्याने, संविधान बदलाचा अपप्रचार झाल्याने महायुतीच्या कामगिरीवर काही अंशी परिणाम होणार हे अपेक्षित होते. 

उत्तर मध्य मतदारसंघातील ॲड. उज्वल निकम आणि ईशान्य मुंबईमधील मिहीर कोटेचा या महायुतीच्या उमेदवारांना वीस हजारांपेक्षा कमी मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीचा विचार करता वीस हजार हे मोठे मताधिक्य नव्हे. या दोन्ही मतदारसंघांची सामाजिक रचना लक्षात घेता व संविधान बदलाचा प्रचार, मुल्ला-मौलवींकडून, धार्मिक स्थळांमधून निघालेले फतवे या पार्श्वभूमीवर ॲड. निकम आणि कोटेचा हे निसटत्या मतांनी पराभूत झाले. रत्नागिरी - सिंधुदूर्ग मतदारसंघात उध्दवसेनेने सारी ताकद पणाला लावली. तिते नारायण राणे यांनी दणदणीत विजय मिळवला. शेजारच्या रायगड मतदारसंघातही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ८० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कोकणातील चाकरमानी एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वाला पसंती देतो आहे, असाच निष्कर्ष या निकालातून निघतो.  

     रायगड मतदारसंघात  महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाची साथ होती. तरीही महायुतीने सहज विजय मिळवला.      मावळ मतदारसंघातील  पनवेल आणि कर्जत या रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्येही शिवसेना - महायुतीचे श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले आहे.     याचा अर्थ स्पष्ट आहे तो  म्हणजे कोकणपट्ट्याने शिवसेना असली शिवसेना आहे, असा कौल दिला आहे.      अनेक प्रयत्न करूनही उध्दवसेनेचा मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, हा या निकालाचा अन्वयार्थ आहे.

मोदींवरच विश्वासउध्दवसेनेकडून मराठी - गुजराती वाद पेटवला गेला. गुजराती उमेदवारांना मतदान करू नका, अशा प्रकारचे आवाहन समाजमाध्यमातून केले गेले. अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या. तरीही मतदारांनी कोणतेही धार्मिक, भाषिक वाद लक्षात न घेता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शवला. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाMahayutiमहायुती