Maharashtra Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरातील विविध मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक ३७.३३ टक्के मतदान झालं असून पुण्यात सर्वांत कमी २६.४८ टक्के मतदान झालं आहे.
कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
नंदुरबार -३७.३३जळगाव-३१.७०रावेर - ३२.०२जालना - ३४.४२औरंगाबाद - ३२.३७मावळ -२७.१४पुणे - २६.४८शिरूर - २६.६२अहमदनगर - २९.४५शिर्डी - ३०.४९बीड - ३३.६५
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात?
मतदारसंघ आणि उमेदवारांची संख्या
नंदुरबार - ११जळगाव - १४रावेर - २४जालना - २६औरंगाबाद - ३७मावळ - ३३पुणे - ३५शिरुर - ३२अहमदनगर - २५शिर्डी - २०बीड - ४१
दरम्यान, महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी आज मतदान होत आहे.