‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:49 PM2024-06-01T21:49:31+5:302024-06-01T21:50:38+5:30

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोडी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता कसा कौल देते, याकडे राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'Chanakya' shocks Mavia, India Today's poll also increases tension, Grand Alliance will win almost so many seats |  ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा

 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा

मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोडी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता कसा कौल देते, याकडे राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र  येथे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत झाल्याने येथे काय निकाल लागेल, याबाबत अंदाज लावणं कठीण झालं होतं. दरम्यान, आज लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर येत असलेल्या एक्झिट पोलमधूनही महाराष्ट्राबाबत संमिश्र चित्र दर्शवलं जात होतं. मात्र धक्कादायक अंदाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या टुडेज चाणक्यने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का देणारा अंदाज वर्तवला आहे. चाणक्यच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला १५ तर महायुतीला ३३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाने महाराष्ट्रात  महायुतीला २८ ते ३२ आणि महायुतीला १६ ते ३२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

टुडेज चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला मागच्या निवडणुकीपेक्षा जागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणांमध्ये महायुती ही ३३ जागांपर्यंत मजल मारू शकते. तर महाविकास आघाडीला १५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जागांमध्ये ५ जागांची वाढ किंवा घट होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर मागच्या काही निवडणुकांमध्ये अचूक निकालांसाठी प्रसिद्ध असलेल्या इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमधूनही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विजयाचं भाकित करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला २८ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पक्षनिहाय जागा पाहायच्या झाल्यास भाजपाला २० चे २२ जागा, शिवसेना शिंदे गट ८ ते १०, अजित पवार गट १ ते २, शिवसाना ठाकरे गट ९ ते ११, शरद पवार गट ३ ते ५ आणि काँग्रेसला ३ ते ४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Web Title: Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'Chanakya' shocks Mavia, India Today's poll also increases tension, Grand Alliance will win almost so many seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.