Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्व राजकीय पक्ष अॅक्टिव्ह झाले आहेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM)ने आगामी लोसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही यात समावेश आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaj Jalil) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर बिहारचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान (Akhtarul Imam) किशनगंजमधून निवडणूक लढवतील. स्वतः ओवेसी हैदराबादमधून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारांची घोषणा करताना ओवेसी म्हणाले की, लवकरच बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणारएमआयएमकडून किती जागा लढवणार, हे अद्याप ओवेसींनी सांगितलेले नाही. मात्र, इम्तियाज जलील यांनी MIM महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते. त्यानुसार, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघातून पक्ष आपला उमेदवार उभा करणार आहे. याशिवाय, बिहारमधील 11 जागांवर MIM आपले उमेदवार उभे करण्याचा अंदाज आहे.