महाराष्ट्राने BJP ला नाकारलेलं नाही; फडणवीसांनी आकडेवारी दिली, पराभवाची कारणंही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:10 PM2024-06-05T15:10:19+5:302024-06-05T15:11:05+5:30

"देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल."

Lok sabha election, "Maharashtra has not rejected BJP"; Devendra Fadnavis gave the statistics, also explained the reasons for the defeat | महाराष्ट्राने BJP ला नाकारलेलं नाही; फडणवीसांनी आकडेवारी दिली, पराभवाची कारणंही सांगितली

महाराष्ट्राने BJP ला नाकारलेलं नाही; फडणवीसांनी आकडेवारी दिली, पराभवाची कारणंही सांगितली

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवढणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपच्या नेतृत्वातील NDA ला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसला. या निकालानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली. तसेच, या निवडणुकीत भाजप आणि विरोधकांना मिळालेल्या मतांची संपूर्ण आकडेवारीही मांडली.

विरोधकांनी युकीचा नरेटिव्ह सेट केला
फडणवीस म्हणाले की, "देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. विरोधकांनी मिळून एक मोठा नरेटिव्ह सेट केला होता, त्याचा आम्हाला फटका बसला. पण, तरीदेखील भाजपच देशात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल. नक्कीच महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही."

"राज्यात आमची लढाई महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. त्यांनीदेखील संविधान बदलणार, मराठा आंदोलन आणि अल्पसंख्यांकाबाबत एक नरेटिव्ह तयार केला. काही प्रमाणात अल्पसंख्यकाचे ध्रुवीकरण झाले, त्याचाही आम्हाला फटका बसला आहे. शिवाय, आमच्या काही उमेदवारांबाबत अँटी इन्कबन्सी होती, ती आम्ही ओळखू शकलो नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे स्थानिक मुद्दे होते, त्याचा मतांवर परिणाम झाला. काही भागांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चुकीचा नरेटिव्ह तयार करण्यात आला. विशेषत: मराठवाड्यात आम्ही खुप मागे पडलोत. पण, मतदारांचा जनादेश मान्य करुन आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत," असे फडणवीस म्हणाले.

अशी आहे मतांची आकडेवारी 
यावेळी फडणवीसांनी महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांची आकडेवारी मांडली ते म्हणाले की, "आम्ही नक्कीच खुप कमी जागा जिंकल्या आहेत, पण एकूण महाविकास आघाडीला 43.91 टक्के मतदान मिळाले अन् आम्हाला 43.60 टक्के मिळले. अर्धा टक्क्यापेक्षा कमी फरकाने आम्हाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मतांची संख्या बघितली तर, त्यांना 2 कोटी 50 लाख मते मिळाली अन् आम्हाला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. म्हणजेच, अवघ्या 2 लाख 3 हजार 192 मतांनी आमचा पराभव झाला आहे." 

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

"फक्त मुंबईचा विचार केला, तर मुंबईत विरोधकांना 24 लाख मते अन् आम्हाला 26 लाख मते मिळाली आहेत. तसेच, आमच्या 8 जागा चार टक्क्यांपेक्षा कमी फरकाने आणि 6 जागा फक्त 30 हजारांच्या फरकाने गमावल्या आहेत. काही जागा तर 2-4 हजारांच्या फरकाने हरलो आहोत. याचाच अर्थ ही निवडूक अतिशय ठासून झाली आहे. थोडीफार कमतरता आल्यामुळे आम्ही मागे राहिलो. 2019 मध्ये आम्हाला 27.83 टक्के मते मिळाली होती अन् 23 जागा  जिंकल्या होत्या. आता दीड टक्क्याने कमी आहोत अन् 9 वर आलो आहोत. 2019 मध्ये काँग्रेसला 16 ट्केक मते आणि एक जागा होती, आता 17 टक्के आणि 14 जागा झाल्या आहेत. याचा अर्थ आम्हाला जनतेते नाकारले असे होते नाही. आम्ही अगदी थोड्या फरकाने पराभूत झालो आहोत," असेही फडणवीस म्हणाले. 

Web Title: Lok sabha election, "Maharashtra has not rejected BJP"; Devendra Fadnavis gave the statistics, also explained the reasons for the defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.