शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 5:21 PM

Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत ठाकरेविरुद्ध शिंदे असा सामना १३ जागांवर पाहायला मिळाला. त्यातील सर्वात जास्त जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या. 

मुंबई - राज्यातील शिवसेनेत फूट पडून त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे २ गट पडले. निवडणूक आयोगानं शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंकडे सोपवले तर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागलं. निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरी खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर जनतेच्या मतपेटीतूनच मिळणार असं बोललं जातं होतं. त्यात लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे शिलेदार १३ जागांवर एकमेकांसमोर उभे होते. त्यातील उद्धव ठाकरेंपेक्षा एक जागा जास्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जिंकली आहे.

निवडणूक निकालात या १३ जागांपैकी तब्बल ७ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या तर ६ जागांवर उद्धव ठाकरेंना समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे या ६ जागांपैकी अनेक मतदारसंघ हे एकेकाळचे ठाकरेंचे बालेकिल्ले राहिलेत. त्यामुळे या ७ जागांवरील विजय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बळ देणारा आहे. छत्रपती संभाजीनगर, ठाणे यासारख्या मतदारसंघातही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा हजारोंच्या मताधिक्याने पराभव झाला आहे. 

कोणत्या आहेत त्या १३ जागा?

जागाउद्धव ठाकरेंचे उमेदवारएकनाथ शिंदेंचे उमेदवारविजयी शिलेदार
बुलढाणानरेंद्र खेडेकरप्रतापराव जाधव प्रतापराव जाधव
कल्याण वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेश्रीकांत शिंदे
मावळ संजोग वाघेरे पाटील श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे
हिंगोली नागेश पाटील आष्टीकर बाबूराव कदमनागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरेसंदीपान भुमरेसंदीपान भुमरे
हातकणंगले सत्यजित पाटीलधैर्यशील मानेधैर्यशील माने
यवतमाळ वाशिमसंजय देशमुखराजश्री पाटीलसंजय देशमुख 
ठाणे राजन विचारेनरेश म्हस्केनरेश म्हस्के
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरेसदाशिव लोखंडेभाऊसाहेब वाकचौरे
नाशिकराजाभाऊ वाजेहेमंत गोडसेराजाभाऊ वाजे
दक्षिण मुंबई अरविंद सावंत यामिनी जाधवअरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाईराहुल शेवाळेअनिल देसाई
उत्तर पूर्व मुंबईअमोल किर्तीकररवींद्र वायकररवींद्र वायकर

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत २१ जागा लढवल्या होत्या, त्यातील ९ जागांवर त्यांचा विजय झाला आहे. त्यात चंद्रकांत खैरे, अनंत गीते, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यासारख्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. कोकणात विनायक राऊतांचा पराभव करून भाजपाच्या नारायण राणेंनी विजय मिळवला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४