काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली आहे. केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकलीय. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमनं आधीच स्पष्ट केलंय. परंतु, त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. तसंच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं.
वंचित बहुजन आघाडीच्या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्याची जातही नमूद करण्यात आली आहे. सर्वच वंचित घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं या यादीत पाहायला मिळतं.
वंचित बहुजन आघाडीचे ३७ उमेदवार असेः
१. वर्धाः धनराज वंजारी२. रामटेकः किरण रोडगे-पाटनकर३. भंडारा-गोंदियाः एन. के. नान्हे४. गडचिरोली-चिमूरः डॉ. रमेश गजबे५. चंद्रपूरः अॅड. राजेंद्र महाडोळे६. यवतमाळ-वाशिमः प्रो. प्रवीण पवार७. बुलडाणाः बळीराम सिरस्कार८. अमरावतीः गुणवंत देवपारे ९. हिंगोलीः मोहन राठोड१०. नांदेडः प्रा. यशपाल भिंगे११. परभणीः आलमगीर खान अखिल मोहम्मद खान१२. बीडः प्रा. विष्णू जाधव १३. उस्मानाबादः अर्जुन सलगर१४. लातूरः राम गारकर१५. जळगावः अंजली रत्नाकर बाविस्कर१६. रावेरः नितीन कांडेलकर१७. जालनाः डॉ. शरदचंद्र वानखेडे१८. रायगडः सुमन कोळी१९. पुणेः अनिल जाधव२०. बारामतीः नवनाथ पडळकर२१. माढाः अॅड. विजय मोरे२२. सांगलीः जयसिंग शेंडगे२३. साताराः सहदेव एवळे२४. रत्नागिरी-सिंधुदुर्गः मारुती रामचंद्र जोशी२५. कोल्हापूरः डॉ. अरुणा माळी२६. हातकणंगलेः अस्लम बादशाहजी सय्यद२७. नंदुरबारः दाजमल गजमल मोरे२८. दिंडोरीः बापू केळू बर्डे२९. नाशिकः पवन पवार३०. पालघरः सुरेश अर्जुन पडवी३१. भिवंडीः डॉ. ए. डी. सावंत३२. ठाणेः मल्लिकार्जुन पुजारी३३. मुंबई दक्षिणः डॉ. अनिल कुमार३४. मुंबई दक्षिण मध्यः डॉ. संजय भोसले३५. ईशान्य मुंबईः संभाजी शिवाजी काशीद३६. मावळः राजाराम पाटील३७. शिर्डीः डॉ. अरुण साबळे