शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Unmesh Patil : "या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी..."; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 2:30 PM

Unmesh Patil And Lok Sabha Elections 2024 : उन्मेष पाटील यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

"महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने किंमत मिळाली नाही."

"मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे. प्रामाणिकपणे काम करत असताना जनता आणि सरकारमधला दुवा म्हणून काम केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला बदला घेण्यासाठी नाही तर बदलासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं."

"मी आवाज उठवला. मला कौतुक नको होतं, थाप नको होती. मात्र आमची अवहेलना करण्यात आली, मला मानसन्मान नको, कार्यकर्त्याची अवहेलना होते तेव्हा तो घुसमटतो. राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही. मान सन्मान नको पण जर आमचा स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलावलं जात नसेल, तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या स्वाभिमानाच्या लढाईत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. क्रांतीची मशाल पेटवायचं ठरवलं" असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव