निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:49 PM2024-05-30T17:49:58+5:302024-05-30T17:50:49+5:30

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे डोळे आहेत. त्यात सोलापूर येथील कम्युनिष्ठ नेते नरसय्या आडम यांनी सोलापूर मध्य मतदारसंघावर दावा सांगितला आहे. 

Lok Sabha Elections - Congress men came with lakhs of rupees, says Communist leader Narsayya Adam | निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान

निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान

सोलापूर - Narasayya Adam on Congress ( Marathi News ) आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली. मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. १ रुपयाही न मागता शहरातील कार्यकर्त्यांनी काम केले. इतकेच नाही तर अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले तेव्हा लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही असं मी त्यांना सांगितले असं विधान ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते नरसय्या आडम यांनी केले आहे. 

सोलापूरात कार्यकर्त्यांशी आडम मास्टर संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की, कुणाचाही १ रुपया न घेता आपल्या कार्यकर्त्यांनी जो स्वाभिमान दाखवला. या लोकसभा निवडणुकीत लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली. आता आपल्यासमोर दुसरं आव्हान येणार आहे. मी परवा मुंबईला गेलो होतो. काही आयएएस अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा २२ ते २६ ऑक्टोबर या काळात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं. आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमात राहू नका असा सल्ला आडम यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

तसेच आतापासून इंडिया आघाडीचे कट चालू आहेत. त्यामुळे आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेत आपल्याला माणसाला पाठवावं लागणार आहे. आपला झेंडा सोलापूरात फडकल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आत्तापासून कष्ट घ्या. कामगार, शेतकरी आणि मध्यम वर्गीयांचे राज्य आणण्याची शपथ आपल्या कॉम्रेड कार्यकर्त्यांनी घेतली. मात्र आज ५५ वर्ष उलटतायेत. त्या शपथेच्या आसपासही आपण पोहचलो नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असंही नरसय्या आडम यांनी म्हटलं. 

लोकसभा निवडणुकीत CPM चा काँग्रेसला पाठिंबा

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपा महायुतीकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात मविआकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे रिंगणात होत्या. या निवडणुकीत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मविआ उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. 

आडम यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेत काँग्रेस माकपला पाठिंबा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसनं कुठलाही शब्द दिला नव्हता. सुशीलकुमार शिंदे यांच्याशीही आडम यांची चर्चा झाली होती. परंतु याबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील असं त्यावेळी आडम यांनी म्हटलं होतं. परंतु आता इंडिया आघाडीकडून कट सुरू असल्याचा आरोप करत आपल्या ताकदीवर सोलापूर मध्य मतदारसंघात लाल झेंडा फडकवायचा असा निर्धार नरसय्या आडम यांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections - Congress men came with lakhs of rupees, says Communist leader Narsayya Adam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.