मुंबई - निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्यांपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांची जास्त चर्चा होती. भाजपला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा मनसे जास्त राजकीय शत्रू वाटत होता. राज ठाकरेंनी ज्या प्रमाणे आपल्या सभेतून भाजपची पोलखोल केली होती, याचा मोठा फायदा विरोधीपक्षाला होईल असा अंदाज वर्तवला गेला होता.परंतु निकालात चित्र काही वेगळचं दिसून आलं. त्यामुळे सोशल मीडियावर राज ठाकरेंना चांगलच ट्रोल केले जात आहे.
राज यांनी आपल्या सभेतून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका केल्या. लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी भाजपाच्या अनेक गोष्टींची पोलखोल केली होती. याचा फरक लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होईल असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र राज्यात भाजपने मुसंडी घेत सर्व अंदाज मोडून काढले आहे. दुसरीकडे मात्र राज यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ' डॉयलॉगची खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत फायदा कुणाला हि हो, पण भाजप सत्तेत नको यायाला पाहिजे अशी भूमिका राज यांनी घेतली होती. तसेच आपल्या प्रत्येक सभेत ते मोदींचे व्हिडिओ लावून पोलखोल करण्याच्या प्रयत्न करत होते. त्यावेळी सोशल मीडियावर 'लाव रे तो व्हिडिओ' ने धुमाकूळ घातला होता. आज मात्र त्याच्या जागी 'बंद कर रे तो व्हिडिओ' अशा पोस्ट सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.