शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

‘मातोश्री’वर लोकसभेची रणनीती; उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 7:18 AM

राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता येत्या काळात महाविकास आघाडी आक्रमक होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

 मुंबई - महाविकास आघाडीचे रखडलेले जागावाटप आणि लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. रविवारी चेन्नीथला महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत राज्यातील सद्य:स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

रस्त्यावरचे आंदोलन सुरू करण्याबाबतही चर्चामहाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून, रविवारी सकाळी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत.

रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे नेते पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पश्चिम उपनगरात एका कार्यकर्ता मेळाव्यातही ते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता येत्या काळात महाविकास आघाडी आक्रमक होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून रस्त्यावरचे आंदोलन सुरू करण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी