मुंबई- लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीला सुरवात झाली असून, प्रत्येकाला आपल्या मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र गडचिरोली-चिमूर दिंडोरी, सातारा, लातूर , नंदुरबार, अकोला या मतदारसंघांतील निवडणूक निकाल उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वप्रथम येथील निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या मतदार संघातील विजय उमेदवार सर्वात आधी गुलाल उधळणार आहे.
दुसरीकडे राज्यातील बीड, माढा, पुणे, नागपूर, लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल उशिराने हाती येणार आहेत. सर्वाधिक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने या लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक निकाल येण्यास विलंब होणार आहे.
महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी हाती येण्याची शक्यता आहे. सुरवातीला 6 मतदार संघातील निकाल अंदाजे 1 वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.सद्या महाराष्ट्रात भाजप 7,. कॉंग्रेस 2 जागांवर आघडीवर आहे.