शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

गुंड सुधारण्यासाठी ‘लोकमंगल’ सोहळा

By admin | Published: February 12, 2017 1:47 AM

चांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची

- संजीव साबडेचांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची वेळ राजकीय पक्षांवर येते. बिच्चारे राजकीय पक्ष. इतरांहून आम्ही वेगळे आहोत, असं सांगणारा भाजपाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे आधी गुंडापुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारू, असं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे सांगितलंय. सुभाष देशमुख गेली अनेक वर्षं सोलापुरात आणि आसपासच्या भागांत खूप चांगलं काम करताहेत. त्यांच्या लोकमंगल संस्थेतर्फे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. त्यात हजारो जोडप्यांचे विवाह त्यांनी लावून दिले आहेत. त्यांना संसारोपयोगी वस्तू वगैरेही दिल्यात. जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतर सुभाष देशमुख गुंडापुंडांना सुधारण्याचे लोकमंगल सोहळेही बहुधा आयोजित करतील. त्या सोहळ्यात वा सुधारणा शिबिरात सहभागी झालेले गुंड नंतर सुधारतील, गंगेत न्हाल्याप्रमाणे स्वच्छ, पवित्र होतील आणि सज्जनांप्रमाणे देशसेवेला लागतील. चांगले लोक राजकारणात येणार नसतील, तर असं काही करावंच लागेल की. सुभाषरावांच्या संस्थेचं नावच लोकमंगल आहे. सर्वांचं मंगल व्हावं असाच त्याचा अर्थ. त्यामुळे गुंडापुंडांचंही मंगल होईल. लोकमंगलच्या सुधारणा शिबिरातून जे बाहेर पडतील, ते नंतर कधीही गुंडगिरी करणार नाहीत, गुन्हेगारी म्हणजे काय, हेच विसरून जातील. सुभाष देशमुखांनी आणखी एक कार्य करावं, आधी गुंड असलेल्या आणि नंतर शिबिरामुळे सुधारलेल्यांवरचे सारे खटले काढून टाकावेत. गुन्हे रद्द करून टाकावेत. भले ते खुनाचे, खुनाच्या प्रयत्नाचे, खंडणीचे, फसवणुकीचे कसलेही असेनात. सुभाष देशमुख स्वत: सरकारमध्ये असल्यानं त्यांना खटले काढून घेणं शक्य होईलच. सुधारलेल्या या सज्जनांना निष्कारण कोर्टात आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळच येता कामा नये. त्यामुळे त्यांची आणि भाजपाचीच बदनामी होईल की. सुधारलेल्यांना शिक्षा होणं, हे अन्यायकारकच. लोकमंगलचे विवाह सोहळे सोलापुरात आणि मराठवाड्याच्या काही भागांतच होत असले तरी सुभाष देशमुखांनी लोकप्रतिनिधी झालेल्या गुंडांसाठी राज्यभर सुधारणा सोहळे आयोजित करायलाही हरकत नाही. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. नंतर देशभर त्यांनी विजयी गुंडांना सुधारण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.पुढील निवडणुकांत भाजपानं नव्या गुंडांना उमेदवारी द्यावी, निवडून आणावं आणि त्यांना सुधारण्याचं लोकमंगल कार्य देशमुखांच्या हातूनच घडावं. अशा प्रकारे काही काळानं राजकारणात येणारा प्रत्येक जण सज्जनच असेल. भाजपाचा प्रश्नच सुटेल. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्यापुढे अनेक दरोडेखोरांनीही शरणागती पत्करली होती. त्या साऱ्या दरोडेखोरांनी नंतर सामान्यांसारखं जीवन जगायला सुरुवात केली होती. सुभाषराव ज्यांना सुधारणार आहेत, ते तर आधीच जिल्हा परिषद वा महापालिकेवर निवडून आलेले असतील. त्यामुळे ते थेट समाजसेवेलाच लागतील. जनतेला अशाच समाजसेवकांची, लोकप्रतिनिधींची खूप खूप खूप खूप गरज आहे. त्यामुळे सुभाषराव, लवकरात लवकर हे लोकमंगल कार्य हाती घ्याच तुम्ही. त्यांना आधी नक्की निवडूनही आणा.