ठाणे – मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. पवारांनी जातीजातीत द्वेष निर्माण करण्याचं राजकारण केले असा आरोप राज ठाकरेंनी केला. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका करत तुमचे जे काय राजकीय विचार आहेत ते शरद पवारांच्या सिल्व्हर ओकच्या दारापुढे संपत आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा उत्तम वकृत्व नेता नाही म्हणून तुम्ही काय शरद पवार यांना टार्गेट करत आहेत का? मिळणार काय? यात महाराष्ट्र अनेक विचार करत आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे उगाच घडलेला नाही. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारक याठिकाणी तयार झाले जमले तर चैत्य भूमीवर जाऊन या? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याची निर्मिती कशी झाली ते बघा?. अनेक संतांची लिखाण वाचा. धर्मामध्ये संघर्ष लावून आता तुम्हाला काही होत नाही .आता तुम्हाला जाती पेटवायचे आहेत का? अनेक लोकांना महागाई नोकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे त्याच्याशी संघर्ष करत संसार चालत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मला आनंद आहे गेल्या ६० वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे राज ठाकरेंचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला. राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या काकांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र त्यांची मैत्री होती मात्र पुतण्या आता द्वेषापोटी आणि त्यात राजकारणात भीष्म पितावरती टीका करणाऱ्यांवर हेडलाईन मिळवली जाते असं सांगत आव्हाडांनी राज ठाकरेंना फटकारलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार १९२६ साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली .पत्र व्यवस्थित वाचा असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.