शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘इफ्फी’त लोकमान्यचा वर्ल्ड प्रीमियर

By admin | Published: November 26, 2014 11:23 PM

चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांची निराशा झाली.

संदीप आडनाईक- पणजी -गोव्यात सुरु असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्य : एक युगपुरुष या मराठी चित्रपटाचा बुधवारी वर्ल्ड प्रीमियर झाला. या खास शोसाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता सुबोध भावे, निर्मात्या नीना राऊत, नाना पाटेकर, सुधीर मिश्रा, खासदार भारतकुमार राऊत उपस्थित होते.लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला ‘इफ्फी’त प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांची निराशा झाली. अनेकांना परत जावे लागले, तर काहींनी घुसखोरी करुन चित्रपट उभा राहून पाहिला. यावेळी चित्रपटाचे तंत्रज्ञ कौस्तुभ सावरकर, संगीतकार महेश म्हात्रे, वितरक एस्सेल व्हिजनचे निखिल साने, मल्हार पाटेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार भारतकुमार राऊत यांचे चिरंजीव ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटासाठी ओम राऊत यांनी काही वर्षे अभ्यास केला. लोकमान्यांच्या साहित्यावर संशोधन करुन या युगपुरुषाची आणि त्यांच्या देशभक्तीच्या विचारांची आजच्या परिस्थितीत कशी गरज आहे, याविषयी हा चित्रपट भाष्य करतो आहे. चित्रपटात आगरकर आणि लोकमान्य यांच्या वैचारिक संघर्षाचा आजचा संदर्भ देत युवापिढीला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.अभिनेता नाना पाटेकर याने लोकमान्यांची भूमिका करणाऱ्या सुबोध भावे याचे तोंडभरुन कौतुक केले. प्रेक्षकांशी संवाद साधताना दिग्दर्शक ओम राऊत याने मी गोयंचा नातू आसा, असे भाषण करून गोयंकरांचे मन जिंकून घेतले. गोव्याच्या भूमीत माझ्या पहिल्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर होतोय, याचा मला अभिमान वाटतो, असे सांगून देव त्यांचे भले करो, अशा शब्दांत गोव्यातील चित्रपट रसिकांविषयी त्याने आदर व्यक्त केला. ‘इफ्फी’त माझा चित्रपट दाखविला जातोय, हा माझा सन्मान आहे, असेही ओम म्हणाला. पाच वर्षांचा करारस्वतंत्र माहितीपट निर्माते असोसिएशनने (आयडीपीए) दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीसोबत माहितीपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष आणि माहितीपट निर्माते माईक पांडे यांनी बुधवारी गोव्यात दिली.