शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

लोकमत बांधावर! साहेब, आम्ही जगावे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 3:11 AM

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली

राजकुमार देशमुख सेनगाव (जि. हिंगोली) : साहेब, व्हतं- नव्हतं सर्व लावून पेरणी केली. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केले. अंगावर कर्ज आहे. सोयाबीन तर सगळे गेले. मी काय करू, अशी हतबल विचारणा तालुक्यातील भानखेडा येथील आनंदा प्रल्हाद कोटकर या शेतकऱ्याने पाहणी दौºयावर आलेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली.सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या पावसाने पूर्णत: भिजल्या आहेत. त्यामुळे जागेवरच सोयाबीनला बुरशी चढली असून कोंब फुटले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.भानखेडा शिवारात अल्पभूधारक शेतकरी जगन्नाथ सीताराम कोटकर या तरुणाच्या शेताला भेट दिली. यावेळी पावसाने सडलेल्या सोयाबीनची सुडी लावणे चालू होते. ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी व समवेतचे अधिकारीही सुन्न झाले. सर्व नुकसानाचे पंचनामे करून घ्या, हताश होऊ नका. शासन आपल्यासोबत आहे. लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.शेतकरी भावनाविवशजिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली. जिल्हाधिकाºयांसमोर आनंदा प्रल्हाद कोटकर हा शेतकरी भावनाविवश झाला. पाच एकराची सडत चाललेली सोयाबीनची सुडी उकरून दाखवत ‘साहेब ...आम्ही जगाव कसे ? व्हत्याचं नव्हतं झालं. आमचा कोणी वालीच उरला नाही’, अशी अगतिकता त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाºयांनी त्यांचे सांत्वन केले.

सोलापूरमध्ये खरबुजाचे नुकसानकांद्याचेही मोठे नुकसान सतीश बागल/नासीर कबीरअरुण बारसकर पंढरपूर/करमाळा/सोलापूर (जि. सोलापूर) : मागच्या वर्षी दुष्काळ होता.. यंदा कांदा, बाजरी, मका ही पिके हाताला आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास पळवला. यावर्षी चांगले आलेले खरबुजाचे पीक अतिवृष्टीमुळे जागेवरच सोडून द्यावे लागले. ही सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे.

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट पक्वतेच्या अवस्थेत होता. यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला होता. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले.खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली. दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील चांगुणा बबन ढावरे म्हणाल्या की, गेल्या वर्षीपासून पाऊस आमच्यावर रुसला होता म्हणून रानात कसलीच पेर केली नाही. रान पडीक ठेवले होते, पण आता थोड्या पावसावर रब्बी हंगामात ज्वारी दोन एकरमध्ये पेरली. तिची उगवण झाली, पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सुटीच दिली नाही़ यामुळे संपूर्ण ज्वारी पाण्यात बुडाली आहे. हिवरवाडी येथील राजेंद्र मेरगळ यांच्या दीड एकर क्षेत्रात मेथी, शेपू, कोथिंबीर या पालेभाज्या पावसाने चिखल व दलदल निर्माण होऊन सडल्या आहेत. दररोज यातून सात-आठशे रुपये मिळायचे, पण ते आता बंद झाले आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाची एकही दिशा अशी नाहीकी तेथे कांदा दिसत नाही. आॅगस्टमध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर कांदा लागवड केली तर काहींना शिरापूर उपसा सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला. आॅक्टोबरमधील थंडीमुळे कांदा मोठा होतो व दिवाळीनंतर काढणीची लगबग सुरू होते. मात्र, यावर्षी संपूर्ण आॅक्टोबरमध्ये पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीRainपाऊस