'रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम' या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला, संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा आणि मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडणारा दिवाळी अंक म्हणजे 'लोकमत दीपोत्सव'! गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या शोधणाऱ्या या दिवाळी अंकानं मराठी साहित्य रसिकांच्या, अभिरुचीसंपन्न वाचकांच्या मनात स्वतःचं स्थान मिळवलं आहे. २०२४ हे निवडणूक वर्ष असल्यानं या वर्षीचा दीपोत्सव 'खुर्ची'भोवती फिरणारा आहे.
'खुर्ची' - 'सत्ते'पासून 'सेक्स'पर्यंतः 'तिला' बळकावण्याच्या बेधुंद खेळाचा भन्नाट शोध, या थीमवर आधारित यंदाच्या 'दीपोत्सव'मध्ये डॉ. अभय बंग, योगेंद्र यादव, महेश झगडे, डॉ. शिरीषा साठे, डॉ. सबीहा, डॉ. भूषण शुक्ल, वंदना अत्रे अशा मान्यवरांचे लेख वाचता येतील. (अधिक माहितीसाठीः https://deepotsav.lokmat.com/)
गेल्या वर्षी 'दीपोत्सव' दिवाळी अंकाच्या तीन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. यावर्षीही 'दीपोत्सव'चं बुकिंग सुरू झालं असून दिवाळीआधी तुम्ही तुमची प्रत सवलतीच्या किमतीत नोंदवू शकता. 'दीपोत्सव'च्या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला दीपोत्सवमध्ये नेमकं काय-काय आहे, हे कळेल आणि अंकाचं बुकिंगही करता येईल.