पुणे : मौजमस्तीचा मौका मिळाला; पण ‘दिल नहीं भरा’. पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी कोथरूड परिसरातील महेश विद्यालयासमोरील रस्त्यावर रविवारी (दि. २२) टीव्हीएस स्कुटी झेस्ट प्रस्तुत ‘लोकमत धमाल गल्ली’ अवतरणार आहे. सायकलिंग, बॅडमिंटनपासून फुटबॉल खेळण्याची आणि झुंबा डान्ससोबत एरोबिक्सवर थिरकण्याबरोबर फ्लॅश मॉब, स्केटिंग, गोट्या आणि विटीदांडूच्या खेळामध्येही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मैत्रीचे नवे धागे विणत, जुने धागे आणखी घट्ट करण्याचा ‘मौका’ साधण्यासाठी अनेकांनी ‘प्लॅनिंग’ केले आहे. आपल्या ग्रुपसोबत आपणही प्लॅन्स ठरवा आणि सहभागी व्हा.यंदा धम्माल गल्लीत धम्माल गल्लीत यंदा इच्छुकांना टीव्हीएस स्कुटी जेस्टची टेस्ट ड्राईव्ह अनुभवयाला मिळणार आहे. लकी ड्रॉद्वारे चांगल्या टेस्ट ड्राईव्ह देणाऱ्यांना आकर्षक चांदीची नाणी मिळतील. झुंबा डान्स : एकत्र येऊन नाचण्या-बागडण्याची मजा लुटत संघभावनेचे (टीम स्पिरिट) संवर्धन करू या. सायकलिंग : सायकलिंग करण्यासाठी मोकळा रस्ता शोधण्यापेक्षा या धमाल गल्लीत सायकलवर स्वार व्हा.स्केटिंग : मोकळ्या रस्त्यावर स्केटिंगच्या थ्रिलची मजाच काही और.।बॅडमिंटन : भररस्त्यात उभे राहून बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन दोस्तांना द्या खुले आव्हान.टॅटू/नेलपेंट/मेंदी : टॅटूच्या रंगात रंगण्याची संधी. मुलींच्या छोटेखानी नखांवर नेलपेंटिंगचे नक्षीकाम आणि मेहंदी लायेगी रंग.किड्स कॉर्नर : लहान मुलांसाठी निरनिराळ्या स्पर्धांची पर्वणी इथे लुटता येणार आहे.आर्ट अँड क्राफ्ट : हस्तकलेचा आविष्कार दाखविण्याची संधी.या धमाल गल्लीचे सहप्रायोजक आहेत डायनामिक डिस्ट्रीब्युटर, गुजरात कॉलनी कोथरूड, पुणे.
‘लोकमत धमाल गल्ली’ अवतरणार
By admin | Published: May 20, 2016 1:51 AM