शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
3
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
4
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
5
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
6
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)
7
'तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली...', 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांची खास पोस्ट
8
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
9
ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला
10
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
11
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
12
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
13
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
14
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
15
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
16
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
17
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
18
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
20
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

‘लोकमत दिवाळी उत्सव २०१६’ सर्वत्र उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2016 4:01 AM

दिवाळीच्या आनंदमयी पर्वात साहित्यमेव्याची भर घालणारा लोकमतचा दिवाळी उत्सव २०१६ अंक प्रसिद्ध झाला

नागपूर : दिवाळीच्या आनंदमयी पर्वात साहित्यमेव्याची भर घालणारा लोकमतचा दिवाळी उत्सव २०१६ अंक प्रसिद्ध झाला असून तो सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंकाचे संपादक सुरेश द्वादशीवार हे आहेत. विवेकमार्गी समाजासाठी प्राणांची बाजी लावलेल्या तीन व्यक्तिरेखांविषयी त्यांच्याच कुटुंबीयांनी व्यक्त केलेले मनोगत यात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांविषयी लिहिले आहे त्यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांनी. गोविंदराव पानसरे यांच्याविषयी मेघा पानसरे यांनी तर एम.एम. कलबुर्गी यांच्याविषयी कर्नाटकचे विख्यात विचारवंत व लेखक राजेंद्र चेन्नी यांनी. स्त्रियांना बंदी असलेल्या मंदिरात त्यांनी प्रवेश करावा की करू नये या प्रश्नामागच्या सामाजिक, मानसिक व राजकीय जडणघडणीवर प्रकाश टाकत आहेत, विद्या बाळ, मंगला आठलेकर, सीमा साखरे, रूपा कुलकर्णी, मनीषा सबनीस व अरुणा सबाने. याच परिसंवादात वाचा या आंदोलनाच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची विशेष मुलाखत. प्रादेशिक पक्ष व राष्ट्रीय ऐक्य या विषयावरील परिसंवादात सहभागी झाले आहेत, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, दत्तप्रसाद दाभोलकर, अभिनंदन थोरात व वसंत भोसले. विदर्भाचे राज्य वेगळे का हवे, याविषयी अ‍ॅड. श्रीहरी अणे, राम नेवले व सुरेश द्वादशीवार यांची विश्लेषणात्मक मांडणी. ज्या देशात दोन सूर्य उगवतात तेथील साद्यंत वृत्तांत लिहिला आहे मीना प्रभू यांनी. कविता महाजन, ह.मो. मराठे, शिवराज गोर्ले, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आदी नामवंतांच्या कथा, विठ्ठल वाघ, सुखदेव ढाणके, अश्विनी धोंगडे आदी कवींच्या कविता तसेच अरविंद पंचाक्षरी यांचे राशीभविष्य आहे. लोकमत दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)