औरंगाबाद : प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे कॅन्ससशी झुंज देताना आज निधन झाले. अशा प्रकारे एका कलाकाराचे निघून जाणे हे फार मोठे नुकसान आहे. व्यक्तीशः माझ्यासाठीही हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या आठवणी कायमच स्मरणात राहतील, अशा शब्दांत 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राजेंद्र दर्डा यांनी अभिनेता इरफान खान सोबतची एक आठवण शेअर केली आहे.
Irrfan Khan Passed away: 600 रुपये नसल्यानं इरफान खाननं सोडून दिले क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न
या पोस्टमध्ये ते म्हणतात, "प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांनी त्रासदायक कॅन्सरशी झुंज देत अखेर जगाचा निरोप घेतला. एका उत्कृष्ट कलाकाराचे जाणे हे मोठे नुकसान आहे. व्यक्तिगत जीवनात माझ्यासाठीही हे मोठे नुकसान आहे. अनेक आठवणी मनात येत आहेत. इरफान नोव्हेंबर 2017मध्ये औरंगाबादला आले होते. 'लोकमत'च्या लॉनवर गप्पा मारताना त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चौकार आणि षटकार खेचत टाळ्या मिळवल्या होत्या. उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि हॉलीवुडमध्येही तेवढाच दमदार अभिनय करणाऱ्या पद्मश्री इरफान यांनी वैयक्तीक जीवन, फिल्म इंडस्ट्री आणि देशासमोरील ज्वलंत मुद्द्यांवर मोकळ्या मनाने चर्चा केली होती. हृदय जिंकून घेणारे त्यांचे डोळे नेहमीच हृदयात राहतील. विनम्र आदरांजली इरफान."
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन, खऱ्या आयुष्यात असा होता इरफान, पहा फोटो
इरफान यांची तब्येत मंगळवारी अचानक खालावली. यानंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. त्याची अकाली एक्झिट चाहत्यांना चटका लावून जाणारी आहे. इरफानच्या निधनामुळे बॉलिवूडलाही मोठा धक्का बसलाय.
इरफान खानची आणि त्याच्या पत्नीची अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी, त्याच्या निधनाने खचले आहे कुटुंब