पुणो : पुण्याचा वैभवशाली गणोशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा ‘लोकमत’ने सोडलेला संकल्प आज सफल संपूर्ण झाला
आणि पुण्याच्या शिरपेचात विश्वविक्रमाचा आणखी एक तुरा खोचला गेला. विविध रंगांची मनसोक्त उधळण करीत हजारो
चिमुकल्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पांच्या रंगविलेल्या चित्रंनी संख्येचा विश्वविक्रम केला.
सळसळत्या उत्साहाने मैदानावर आलेल्या हजारो चिमुकल्यांनीआपल्या मनातील बाप्पा साकारला.तब्बल 7 हजार 574 शाळकरी मुलांनीसर्व कलांचा देव असलेल्या ‘बाप्पा’गणरायाचे चित्र रंगविले. याविक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्डरेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याची घोषणाझाली आणि येरवडय़ातील गेनबामोङो प्रशालेचा ‘गणपती बाप्पामोरया’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
‘लोकमत’च्या वतीने आयोजितमहालक्ष्मी डेव्हलपर्स प्रा. लि. प्रस्तुत‘आपले बाप्पा’ या उपक्रमांतर्गत गेनबासोपानराव मोङो प्रशालेच्या भव्यमैदानावर या विश्वविक्रमाचा इतिहासरचला गेला. ‘श्लोक’च्या संचालिकाशीतल दर्डा यांना ‘गिनीज बुक’च्या
अधिकारी तुरॅत अलसराफ यांनीविश्वविक्रमाचे प्रमाणपत्र बहाल केले.
विद्याथ्र्याना शुभाशीर्वाद देण्यासाठीसावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचेकुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, पुण्याचे
पोलीस आयुक्त सतीश माथूर, पुणोमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्तओमप्रकाश बकोरिया, गेनबा मोङोशिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोङो,महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रा. लि.चेअध्यक्ष दत्तात्रय गोते, सुमेरू
बेव्हरेजेसचे शेखर मुंदडा उपस्थितहोते. ‘लोकमत’चे संपादक विजयबाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापकनिनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
पुण्याचा गणोशोत्सव म्हणजे उत्साहाचा महामेरू.. आनंदाचे अगणित रंग.. या उत्साह अन् आनंदाला अधिक सजर्नशील व
सुसंस्कृत बनविण्यासाठी ‘लोकमत’ने ‘कृती- निर्मिती- संस्कृती’चा संदेश देणा:या ‘आपले बाप्पा’ या उपक्रमातून पुणोकरांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमाच्याच निमित्ताने विश्वविक्रमाचा संकल्प सोडला होता. शुक्रवारी या विश्वविक्रमाची
संकल्पपूर्ती करून ‘लोकमत’ने पुणोकरांना एक अनोखी भेट दिली आहे. गणरायाला वंदन करून सुरू झालेला हा विश्वविक्रमी प्रवास त्याच्याच चित्ररूपी आशीर्वादाने सफल झाला. यापूर्वीचा विश्वविक्रम 6 हजार 57 चित्रंचा होता.
विश्वविक्रमासाठी गेनबा सोपानराव मोङो प्रशालेच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती.
‘गिनीज बुक’चे अधिकारी सकाळी आठ वाजल्यापासून यावर लक्ष ठेवून होते. विविध शाळांतील मुला-मुलींचे
जथ्ये मैदानावर दाखल होत होते. विश्वविक्रमासाठी देण्यात आलेल्या सर्व सूचनांप्रमाणो संपूर्ण नियोजन
करण्यात आले होते. मैदानावर प्रत्येकी 5क् विद्याथ्र्याचा एक गट करण्यात आला होता. त्यानुसार मुलांना
ब्लॉकमध्ये बसविण्यात आले.बाप्पाचे चित्र रंगवून विश्वविक्रमी
होण्यासाठी मैदानातील प्रत्येक विद्यार्थी उत्साहाने भारावून गेला होता. बाप्पाला वंदन करण्यासाठी प्रत्येक
जण आसुसलेला होता. अधून-मधून होत असलेल्या बाप्पाच्या जयघोषानेसंपूर्ण परिसर दुमदुमून जात होता.
प्रत्येक विद्याथ्र्याला बिंदूंनी तयारकेलेले गणरायाचे चित्र असलेलाकागद, रंग, पॅड देण्यात आले.
संपूर्ण तयारी झाल्यानंतर सव्वाअकरा वाजता ‘गिनीज बुक’च्याअधिका:यांनी ‘थ्री.. टू.. वन.. गो’असे म्हणत हिरवा ङोंडा दाखविला.त्यानंतर प्रत्येक चिमुकल्याचे हात एकएक बिंदू जोडत गणरायाचे चित्रसाकारू लागले. सर्व मुले चित्र
रंगविण्यात मग्न झाली.विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचीत्यांची इच्छाशक्ती उत्तरोत्तर वाढतहोती. ‘गिनीज बुक’च्या अधिका:यांचेयावर बारकाईने लक्ष होते. पुढेजाणारा प्रत्येक क्षण विक्रमाच्या दिशेनेघेऊन जात होता. तब्बल 7 हजार
574 विद्याथ्र्याच्या या मेळ्यात रंगांचीउधळण होत होती. अधिका:यांच्याहीनजरेतून ही उधळण सुटली नाही.अखेर काही वेळाने सर्व विद्याथ्र्याचेचित्र रंगवून झाल्यानंतर अधिका:यांनीवस्तुस्थितीची चाचपणी केली.
विद्याथ्र्याची संख्या, नियमांचे पालन,रंगविलेली चित्रे पाहिल्यानंतर त्यांनीविश्वविक्रम झाल्याची घोषणा केली.
हे शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेल्याप्रत्येकाने या वेळी एकच जल्लोषकेला. गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरयाच्या गजराने आसमंतदुमदुमून गेला. या विश्वविक्रमाचेप्रतीक म्हणून विविध रंगांचे फुगेआकाशात सोडण्यात आले.
‘लोकमत’तर्फे नेहमीच वेगळे व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.विद्याथ्र्यामधील क्षमता ओळखून लोकमतने कौशल्य दाखविण्याचीसंधी या विश्वविक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे.जागतिक पातळीवर सर्वाधिक बुद्धिमत्ता भारतात आहे. विद्याथ्र्याना हवीअसलेली संधी उपलब्ध करून दिल्यास ते आवडीच्या क्षेत्रत यश संपादनकरू शकतात. माणसाने ठरवले, तर तोकाहीही करू शकतो; परंतु त्याच्याकडे जिद्दआणि चिकाटी असली पाहिजे. सातहजारांहून अधिक विद्याथ्र्याकडून एकाच
वेळी गणपतीचे चित्र रंगवून घेण्याचा एकनवीन विश्वविक्रम लोकमत समूहाने रचला
आहे. -डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठकला आणि संस्कृतीच्या अनोख्यासंगमातून हा विश्वविक्रम आजसाकार झाला. विश्वविक्रमाचा
आनंद आहेच; परंतु त्याबरोबर याचिमुकल्या हातांनी रेखाटलेल्या बाप्पांमधूनत्यांच्यातील कलाकारही समोर आला आहे.
मुलांमध्ये चित्रकलेचे अंग उपजतच असते.या प्रकारच्या उपक्रमातून मुलांच्याकलेविषयीच्या जाणिवा अधिक समृद्ध
होण्यास मदत होणार आहे. बाप्पांच्याचित्रंचा विश्वविक्रम ही एक अनोखी घटना ठरणार आहे.
- शीतल दर्डा, संचालिका, श्लोक
‘लोकमत’च्या या उपक्रमाच्या माध्यमातूनभारताला पुढे घेऊन जाणारी पिढी आजविश्वविक्रम करीत आहे. परिश्रम घेऊन बाप्पाचेचित्र रंगवत आहे. भविष्यात यातीलच काही चित्रकारहोऊन देशाचे नाव उज्ज्वल करतील. लोकमतने
गणोशोत्सवातही चांगलेउपक्रम राबविले.विश्वविक्रमाचाउपक्रमही आगळा-वेगळा आहे. लोकमतचे व सर्व
विद्याथ्र्याचे अभिनंदन.
-सतीश माथूर,
पोलीस आयुक्त, पुणो
‘लोकमत’च्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा विशेष आनंद आज वाटत आहे. विद्याथ्र्याना ‘लोकमत’कडून
नेहमीच संस्काराची शिदोरी मिळत असते. विश्वविक्रमाच्या निमित्ताने विद्याथ्र्याचा उत्साह पाहिल्यावर कोणतीही
गोष्ट जगात अशक्य नाही, हेच दिसून येत आहे. कृती- निर्मिती आणि संस्कृतीचा ‘लोकमत’ने संदेश दिला आहे.
- दत्तात्रय गोते, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रा. लि.
‘लोकमत’च्या माध्यमातून गेनबा सोपान मोङो शाळेच्या प्रांगणात हा विश्वविक्रम साकार झाला याचा आनंद आहे. विद्याथ्र्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
- रामभाऊ मोङो, संस्थापक- अध्यक्ष, गेनबा मोङो शिक्षण संस्था