पुणो : ‘आपली नजर, मेंदू, मोबाईल वापरा आणि बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना द्या, कोणतीही बेवारस वस्तू बॉम्ब असू शकते’ हा विषय घेऊन ‘लोकमत’ने थेट नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पुणो आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना बॉम्बस्फोटांबाबत जागृत करण्यासाठी लोकमतने ‘वापरा’ ही संकल्पना घेऊन जनजागृती मोहिमेला सुरुवात केली.
शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि आयटीच्या क्षेत्रमध्ये पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. परंतु जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील बॉम्बस्फोटांमुळे पुण्याला दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
नुकतेच पुण्यामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दाम्पत्यालाही अटक केली होती. राज्य दहशतवाद विरोधी पथक, पुणो शहर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून वारंवार दहशतवादी कारवायांबाबत जगजागृती मोहिमा सुरू असतात. जोर्पयत नागरिक स्वत: जागरुक होऊन या घटनांकडे पाहणार नाहीत तोर्पयत या घटना रोखणो अवघड आहे. त्यामुळे नेहमीच लोकचळवळी आणि लोकांचे प्रश्न धसास लावणा:या ‘लोकमत’ने
हा उपक्रम सुरू केला आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर ‘कोणतीही बेवारस वस्तू बॉम्ब असू शकते’ या आशयाचे 1क्क् फ्लेक्स पुणो, पिंपरी-चिंचवड शहरात लावले
आहेत. (प्रतिनिधी)
दिवाळीच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर नागरिक बाहेर पडत आहेत. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बेवारस वस्तू,
मोबाईल बॅगा, वाहने आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
कोणत्याही वस्तूला हात लावू नका, सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा असे आवाहन करणारे हे शहरभर
झळकलेले फ्लेक्स वाचून लोकांमध्ये जागृती होत आहे.
या फ्लेक्सवर पोलीस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. लक्षवेधक आणि आशयपूर्ण असे हे फलक
पाहून सुरक्षेबाबतचा दृष्टीकोन नागरिकांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एका व्यासपीठावर
आले उमेदवार
हडपसर : निवडणूक प्रचारादरम्यान निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी येथील वकिलांनी पुढाकार घेवून चहापानच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पक्षाचे उमेदवार एकत्र येवून गप्पा मारत एक वेगळा अनुभव त्यांनी सर्वाना दिला. एकाच व्यासपीठावर उमेदवार आल्याने उत्साहाचे वातावरण होते.हडपसर विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एकत्र बोलावून चहापाण्याचा अनौपचारीक कार्यक्रम येथील वकिलांनी आयोजित केला. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेतला. यावेळी महादेव बाबर, प्रमोद भानगिरे, बाळासाहेब शिवरकर आदि उमेदवार उपस्थित होते. अॅड. सत्यजित
तुपे, अॅड. अलोक गायकवाड, अॅड.विनोद रासकर,अॅड. राहुल ङोंडे, अॅड .अमोल कापरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.