महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, 'उद्योग' या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
आसा सिंह(अध्यक्ष, रेडियंट इंडस केम प्रा. लि., मिसेस फूडराइट)
- कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या- ५०० पेक्षा अधिक. कंपनीची अंदाजित उलाढाल -२५० कोटी रुपयांपेक्षा अधिक.
- रसायन आणि अन्न प्रक्रिया असे कंपनीचे एकूण दोन विभाग आहेत. ऑक्झेलिक अॅसिडच्या उत्पादनात आणि निर्यातीत कंपनी भारतात अव्वल स्थानी आहे.
- मेयोनीज, टॉमेटो केचअप, चायनीज सॉस, जेम्स, सरबत, मॉकटेल, लोणचे आदी उत्पादनांची निर्मितीदेखील कंपनी करते.
- १९८२ साली स्थापन झालेल्या या कंपनीने २००९ मध्ये खाद्यान्न क्षेत्रात विस्तार केला आणि कंपनीच्या महसुलात ३९ कोटी रुपयांवरून २५० कोटी रुपये इतकी वाढ झाली. आजच्या घडीला देशातील २२ राज्यांतून कंपनीचा वावर आहे.
सागर गुजर(व्यवस्थापकीय संचालक सीजी लाईफस्टाईल इंडस्ट्रीज प्रा. लि.)
- कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ५२५
- कंपनीची अंदाजित उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक
- महिला, पुरुष, लहान मुले यांच्यासाठी विविध प्रकारच्या फॅशनचे कपडे बनविण्याच्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.
- पारंपरिक भारतीय पोषाखापासून आधुनिक फॅशनच्या कपड्यांची निर्मिती कंपनी करते.
- कोविडच्या काळातदेखील कंपनीने नफा कमावला होता. लोकांच्या गरजा, आवड याचा वेध घेत कंपनी आपल्या उत्पादनांची निर्मिती करते.
दीपक चंदे(मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स)
- कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या - १००
- कंपनीची अंदाजित उलाढाल ४९.५० कोटी
- कंपनी गेल्या ३६ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने नाशिकमध्ये आतापर्यंत १०० पेक्षा जास्त प्रकल्प साकारले आहेत.
- गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य आणि पायाभूत सुविधा विकास आदी क्षेत्रांत कंपनीचे प्रामुख्याने काम आहे.
- उत्तम आर्किटेक्चरच्या माध्यमातून सुंदर व दर्जेदार इमारतींची निर्मिती हे कंपनीचे वैशिष्ट्य आहे.
दशरथ पाटील(मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट प्रा. लि.)
- कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १०००
- कंपनीची अंदाजित उलाढाल १०० कोटी
- नीट आणि जेईई या महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षांसाठी कंपनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते.
- आतापर्यंत कंपनीत प्रशिक्षण घेतलेले दोन हजार विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत.
- सीईटी परीक्षेत ३१ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.
- नीटच्या परीक्षेत ३३ विद्यार्थ्यांनी ३६० पैकी ३६० गुण प्राप्त केले आहेत.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी कंपनीतर्फे विशेष स्कॉलरशिप दिली जाते.
परेश कोल्हटकर(अध्यक्ष, कैलास जीवन आयुर्वेद संशोधनालय)
- कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ४०
- कंपनीची अंदाजित उलाढाल २.५ कोटी
- कंपनी आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असून कैलास जीवन है कंपनीचे उत्पादन अतिशय लोकप्रिय आहे.
- १० वर्षांपूर्वीपर्यंत कंपनी केवळ २ ते ३ राज्यांतून कार्यरत होती. आता कंपनीचा विस्तार देशातील जवळपास सर्व राज्यांत झालेला आहे.
- रशिया, पोलंड, इटली, जर्मनी आणि आता अमेरिकेतदेखील कैलास जीवन या उत्पादनाची निर्यात होत आहे.
ज्यांची नामांकने झाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/