महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, राजकारण (प्रॉमिसिंग) या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
अदिती तटकरे(महिला व बालकल्याण मंत्री, राष्ट्रवादी -काँग्रेस अजित पवार गट, रायगड)- सलग दुसऱ्यांदा आमदार. २०१८ साली वरसे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून निवड.- मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री. शिंदे-भाजप सरकारच्या काळात महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठा सहभाग.- महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असताना जिल्ह्याचे महत्त्वाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले.
अमीन पटेल(आमदार, काँग्रेस, मुंबई)- राज्य सरकारच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे २००७-२०१४ अध्यक्ष.- या काळात विविध योजनांचा सुमारे ३५,००० अल्पसंख्याक कुटुंबांना लाभदिला. सलग चार वेळा मुंबादेवी मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी.- पूर्वी पुनर्विकसित सदनिका केवळ 200 चौरस फुटांच्या मिळत होत्या, सतत पाठपुरावा केल्याने पुनर्विकास प्रकल्पात किमान ३०० चौरस फूट सदनिका मिळवून देण्यात यश.- म्हाडा दुरुस्ती मंडळात १६,००० जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची निधीच्या कमतरतेमुळे दुरुस्ती होत नव्हती, केवळ १०० कोटींचा निधी देऊन त्यांचे काम प्राधान्याने हाती घेतले.
मुरलीधर मोहोळ(केंद्रीय राज्यमंत्री,भाजप, पुणे)- भाजपचा पोलिंग एजेंट ते केंद्रीय मंत्री असा प्रवास. कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी नाही.- गेल्या ३० वर्षांत पक्षाने दिलेली जबाबदारी निभावणारा कार्यकर्ता ही ओळख, तीन वेळा नगरसेवक, पुण्याचे महापौर आणि खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री.- भाजपचे संघटनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले प्रदेश सरचिटणीस पद मिळाले. संघटनेतून आलेला कार्यकर्ता असल्याने मोहोळ यांच्या कार्यपद्धतीत केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही कोणताही फरक पडला नाही.- अफाट जनसंपर्क, प्रश्न सोडवण्याची हातोटी, संघटना हाताळण्याचे कौशल्य यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर.
डॉ. पंकज भोयर(गृहराज्यमंत्री, भाजप, वर्धा)- सन २०१४ पासून सतत तीनदा आमदार. सध्या राज्याचे गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म, शालेय शिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री.- राज्यात प्रथम 'सेवा पंधरवडा' सुरू करून एकाच छताखाली नागरिकांची विविध कामे मार्गी लावली.- गृहराज्यमंत्री म्हणून पोलिसांच्या कुटुंबीयांशी 'संवाद' उपक्रमाद्वारे चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.- डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव प्रयत्न.
प्रकाश आबिटकर(आरोग्यमंत्री, शिवसेना - शिंदे गट, कोल्हापूर)- कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी नाही, राजकारणात गॉडफादर नाही. सहकारी संस्था, फारशी आर्थिक ताकद नसूनही सलग तीन वेळा निवडून येण्याचा इतिहास.- तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद.- कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आजपर्यंत सलग तीन वेळा आमदार, कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद वाट्याला येणारे ते एकमेव.- मतदारसंघात रस्ते, आरोग्य सुविधा, पाटबंधारे प्रकल्पाच्या पातळीवर चांगले काम. मागच्या दहा वर्षात एवढे काम केले की, आता नागरी सुविधांचे फारसे काम शिल्लक नाही.
स्नेहा दुबे(आमदार, भाजप, विरार, जि. पालघर)- वसई-विरारमध्ये गेली ३५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, समाजसेवक विवेक पंडित यांच्या त्या कन्या.- उच्चशिक्षण घेत वकिलीची पदवी (एलएलबी). न्यायाधीश पॅनेलच्या सदस्य म्हणूनही काम.- वाडा आणि विक्रमगडसारख्या दुर्गम भागांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ३०० बचत गट स्थापन करुन तब्बल तीन हजार महिलांना रोजगार दिला.- आई सन्मान मोहिमेतून स्वतःच्या मुलांच्या नावापुढे आईचे नाव नोंदवले आणि राज्यभरात हा विचार रुजवला, या मोहिमेला सरकारनेही मान्यता दिली.ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/