महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, क्रीडा या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
अक्षय वाडकर (क्रिकेट, नागपूर) - (जन्म दिनांक : ९ जुलै १९९४)
- २०१२-१३ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भासाठी पदार्पण
- २०१७ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करत रणजी स्पर्धेमध्ये ६१.६०च्या सरासरीने ३०८ धावा केल्या. २०१७ ला रणजी अंतिम सामन्यात शतक झळकविणारा एकमेव फलंदाज.
- रणजीच्या दुसऱ्या मोसमात केवळ ११ सामन्यांत ६०.४१ च्या सरासरीने ७२५ धावा करत तीन शतके, दोन अर्धशतके झळकावली. रणजी विजेतेपदामध्ये मोलाची भूमिका.
- २०२४ सालच्या रणजी करंडक अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार शतक.
- यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत ८ सामने खेळताना ५८८ धावा फटकावल्या असून दोन शतके आणि एक अर्थशतक झळकावले आहे.
अंकित बावणे (क्रिकेट, छत्रपती संभाजीनगर)
- विजय हजारे करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा विक्रम
- या स्पर्धेत ५६.४७ च्या सरासरीने १५ शतके व १६ अर्धशतकांसह ४ हजार १० धावा केल्या आहेत. आशियाई विजेत्या २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व.
- प्रथम श्रेणीत १२२ सामन्यांत ५१.२२ च्या सरासरीने ८ हजार २४१ धावा. वानखेडे मैदानावर दिल्लीविरुद्ध नाबाद २५८ ही सर्वोत्तम खेळी.
- लिस्ट ए स्पर्धेत अंकितने १२६ सामन्यांत १५ शतके आणि २० अर्धशतकांसह ४ हजार ६५० धावा फटकावल्या. २००९ मध्ये बीसीसीआयचा सर्वोत्तम १५ वर्षांखालील क्रिकेटपटू पुरस्कार.
- २०२४ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये यंदा महाराष्ट्राकडून सर्वाधिक धावांचा विक्रम रचताना सुरेंद्र भावे यांचा विक्रम मोडला.
चिराग शेट्टी (बॅडमिंटन, मुंबई) - (जन्म : ४ जुलै १९९७)
- जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक (२०२२), थॉमस चषक सुवर्ण (२०२२)
- राष्ट्रकुल सुवर्ण (२०१८, २०२२), आशियाई सुवर्ण (२०२२)
- आशियाई अजिंक्यपद सुवर्ण (२०२३)
- अर्जुन पुरस्कार (२०२०), मेजर ध्यानचंद खेलरत्न (२०२३)
- २०२४ मधील कामगिरी:
- मलेशिया ओपन दुहेरी उपविजेतेपद, इंडिया ओपन दुहेरी उपविजेतेपद- फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी जेतेपद- ११ ते १६ मार्चदरम्यान ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेसह डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनल्समध्ये जेतेपदाची अपेक्षा.- पुढील ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा.
प्रियंका इंगळे (खो-खो, पुणे) - (जन्म दिनांक : ३ ऑक्टोबर २०००)
- वयाच्या १२व्या वर्षापासून जिल्हा आणि महाराष्ट्र संघाकडून शानदार कामगिरी
- २०२३मध्ये आशियाई स्पर्धेद्वारे पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
- विश्वचषक खो-खो खो स्पर्धेत सराव शिबिरात कामगिरीमुळेच भारताच्या कर्णधारपदी निवड.
- विश्वचषक खो-खो स्पर्धेत आपल्या नेतृत्वात भारताला यंदा विश्वविजेतेपद मिळवून दिले.
- २३ राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेताना १८ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्यपदके जिंकली आहेत.
- २०२२-२३ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान.
- चौथ्या आशियाई खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या भारतीय संघातून छाप पाडली.
- राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्रच्या यशात मोलाचे योगदान.
संस्कृती वानखडे (बुद्धिबळ, अकोला)
- ५. ६. ७. ८ तसेच १० या वयोगटात आशियाई जेतेपद पटकावले श्रीलंका, उझबेकिस्तान, दक्षिण आफ्रिका, थायलंड, सिंगापूर, मंगोलिया, जॉर्जिया या देशांमध्ये लक्षवेधी कामगिरी
- आशियाई शालेय स्पर्धेत २०११ (५ वर्षे वयोगट), २०१२ (६ वर्षे वयोगट), २०१३ (७वर्षे वयोगट) अशी सलग तीन वर्षे सुवर्ण पदके पटकावली.
- २०२४ मधील कामगिरी :
- आग्रा येथे श्री. धनपत राय सचदेव स्मृती फिडे रेटिंग स्पर्धेत जेतेपद- भोपाळ येथे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद- लवकरच ग्रँडमास्टर किताब पटकावण्याचे लक्ष्य बाळगले आहे.
ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://lmoty.lokmat.com/