उंब्रज, दि. 4 - अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.सातारा येथील चंद्रशेखर शिंदे-देशमुख यांनी दहा हजारांचा धनादेश शंकर कवळे यांच्या हातात सुपूर्द केला. तसेच साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते अन युवा स्वयंरोजगार संस्थेचे अध्यक्ष सचिन अवघडे यांनीही पाच हजारांची रक्कम कवळे यांच्या कुटुंबीयाला दिली. कऱ्हाड तालुक्यातील मरळी गावात राहणारे शंकर कवळे यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, विविध पुस्तकेही प्रकाशन संस्थांनी बाजारात आणली आहेत. एका झोपडीत राहणाऱ्या कवळे यांना परिस्थितीपोटी गवंडी काम करावे लागत असून, सध्या त्यांचे हातावरच पोट भागविली जाते.कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटं गाव. खंडोबाच्या पाली या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. एक गुंठा जमीन नाही. गरिबी पाचवीला पुजलेली; पण शंकर यांना शिकायचं होतं.घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले; पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती. मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली. अन् कवळे यांचीच कथा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी दिला आहे. हा त्यांच्या प्रतिभेचा गौरव आहे. परिस्थितीशी झगडत असलेल्या कवळे यांना सातारकरांनीही मदतीचा हात पुढे देऊ केला आहे.
लोकमत'मुळं गरीब लेखकाला समजलं 'माणुसकीचं मोठेपण'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 7:04 PM