शहरं
Join us  
Trending Stories
1
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
2
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
3
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
4
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
5
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
6
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
7
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
8
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
9
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
10
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
11
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
12
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
13
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
14
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
15
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
16
JEE Mains 2025: राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर
17
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
18
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
19
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
20
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी

मनःशक्ती अन् तणावमुक्तीसाठी यू-ट्युबवर 'लोकमत भक्ती', कीर्तन-प्रवचनातून 'मोटिव्हेशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:13 IST

गुरूपदाला पोहोचलेल्या व्यक्तींची प्रवचनं, कीर्तनं, अभंग तरुणाईला त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावर - अर्थात डिजिटल माध्यमावर मिळावीत, या उद्देशानं आम्ही घेऊन येतोय 'लोकमत भक्ती' हे नवा यू-ट्युब चॅनल

आजच्या स्पर्धेच्या युगात जो-तो 'टार्गेट'च्या मागे पळतोय. स्वप्नं जितकी मोठी, तितकंच हे टार्गेट मोठं. मग, हा पाठलाग करताना अनेकजण अडखळतात, धडपडतात, थकून जातात. पण म्हणून थांबून चालत नाही. आज थकलो, तरी उद्या नवं बळ घेऊन बाहेर पडावंच लागतं आणि भरारी घेण्यासाठी पंख पसरावेच लागतात. या भरारीसाठी तरुणाईच्या मनात नवी उमेद जागवावी, त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं लोकमत आजपासून घेऊन येतोय, 'लोकमत भक्ती' हे नवं यू-ट्युब चॅनल. 

कीर्तन, प्रवचन, अभंगांच्या माध्यमातून अनेक संतांनी समाजप्रबोधन केलं. लोकांना जगण्याचा मंत्र दिला, तंत्र शिकवलं. आजच्या काळातही संतपरंपरेचा हा वारसा जपत, अनेक ज्ञानी व्यक्ती जागृतीचं काम करत आहेत. सुख, शांती आणि सद्भावनेची शिकवण देत आहेत. खास करून, पैसा आणि भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या विचारांची गरज आहे. हे ओळखूनच आज गुरूपदाला पोहोचलेल्या व्यक्तींची प्रवचनं, कीर्तनं, अभंग तरुणाईला त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावर - अर्थात डिजिटल माध्यमावर मिळावीत, असा प्रयत्न 'लोकमत भक्ती' या यू-ट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. 

सद्गुरू वामनराव पै, प्रल्हाद पै, सद्गुरू जग्गी वासुदेव, सत्यपाल महाराज यांची कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं, अभंगांचे व्हिडीओ 'लोकमत भक्ती' या चॅनलवर आपल्याला पाहता येतील. मन शांत कसं ठेवावं, मनःशक्ती जागृत केल्यानं असाध्यही कसं साध्य होऊ शकतं, धर्म, शास्त्र नेमकं काय सांगतं, वेद-पुराणांमधील गोष्टी आजच्या काळात कशा आचरणात आणता येतील, संतांची शिकवण अडचणीतून कसा मार्ग दाखवू शकते, या विषयांवरील निरुपणं 'लोकमत भक्ती'वर पाहता येतील. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेलं इन्स्पीरेशन, मोटिव्हेशन या चॅनलवरून तुम्हाला नक्की मिळेल. तेव्हा, आजच 'लोकमत भक्ती' सबस्क्राईब करायला विसरू नका!'लोकमत भक्ती' सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा!

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकLokmatलोकमत