नागपूर - कुणीही पत्रकार सत्तेच्या विरोधात नव्हे, सत्तेच्या बाजूने नव्हे तर सत्याच्या बाजूने असायला हवं. त्यामुळे धुव्रीकरणाचा विषयच येत नाही. जेव्हा संधी मिळते तेव्हा विचार बेधडक मांडा, मी जे वाचले, शिकले ते समोर मांडले. विचारात बदलाची आवश्यकता असू शकते. आपल्याला समाजाला बदलायचं आहे. त्यात माझे योगदान सकारात्मक आहे की नकारात्मक आहे त्याचे आत्मचिंतन स्वत: करायला हवा असं मत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले.
नागपूर इथं होणाऱ्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते, मुनगंटीवार म्हणाले की, माध्यमांचे धुव्रीकरण होतंय तर माझं उत्तर आहे - नाही, देशात कधीही माध्यमांचे धुव्रीकरण होऊ शकत नाही. विश्वातील ३ संस्कृतींना महान मानले जाते. त्यातील २ संस्कृती नष्ट झाली परंतु भारतीय संस्कृती तशीच कायम आहे. आपल्या संस्कृतीत सहिष्णुता आहे. आपल्या देशात लुटायला खूप होते म्हणून आक्रमण झाली. नाहीतर ना मुघल आले असते ना इंग्रज. कुठल्याही देशात राहिलो तर सूर्य एकच असतो. धुव्रीकरण भाषा आपण का करतो? प्रत्येकजण आपापल्या नजरेने पाहतो. प्रत्येकाचा आपापला विचार आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत दुषित दृष्टीनं जे पाहू ते दुषितच दिसते. धुव्रीकरण कसं होऊ शकते? राजकीय चौकटीच्या बाहेर हजारो विषय आहे ते आपण देऊ शकतो. राजकारणाच्या दृष्टीने धुव्रीकरण दिसते. मोदींच्या विरोधात आणि बाजूने कोण त्यातून आपण हे पाहतोय. आर्थिकदृष्ट्या लोकांना साक्षर बनवणे, जलप्रदूषण, पर्यावरण असे अनेक विषय चिंतनासाठी आहेत. वृत्तपत्र राजकीय केंद्रीत का असतं? वेगवेगळे विषय मांडू शकतात. या देशाला अनेक विषयांवर पुढे नेण्यासाठी काम होऊ शकते. पर्यावरणाला सुरक्षित ठेवणे हा धुव्रीकरणाचा विषय कसा होऊ शकतो? महिलांना स्वावलंबी करणे यात कुठे धुव्रीकरण? पत्रकारांची जबाबदारी आहे असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, मोदींनी वाईट काम केले तर निश्चित त्यावर लिहिलेच पाहिजे. चंद्रपूरात कुठलीही बातमी आली तरी गांभीर्याने घ्या असं मी कार्यालयात सर्वांना सूचित केले आहे. मी अनेकदा यूट्युबर पत्रकारांची भाषणे ऐकतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहतो. काहींच्या चेहऱ्यावर धुतराष्ट्राचा भाव असतो. धुव्रीकरणात प्रेम असू नाही. निंदा असू नये. टीका करायला हवी. जिथे चांगले होत आहे तिथे कौतुकही असायला हवं. विरोधही तर्कसंगत असायला हवा. जे काम करायचं ते प्रामाणिकपणे करा. बातमी लिहिताना तर्क असायला हवा. आपण तोंड बंद करू शकतो, डोळे बंद करू शकतो पण कान बंद करू शकत नाही असंही मुनगंटीवार म्हणाले.
मी पण पत्रकारितेची पदवी घेतलीयमी राजकीय नेता आहे परंतु मी माध्यमाची पदवी घेतली आहे. Bacholor of Journalisum केलंय, मी M.com, MA केलंय. आणि ही पदवी त्या काळात घेतलीय जेव्हा नागपूर विद्यापीठात हा कोर्स होतो. त्यासाठी ६०० अर्ज यायचे आणि त्यातील ४० जणांची निवड व्हायची. आम्हाला १२ विषय होते, एकाही विषयात अनुत्तीर्ण झाले तरी पुरवणी परीक्षेत पुन्हा सर्व विषयांची परीक्षा द्यावी लागते. जर एक चुकीची बातमी दिली तर त्याचा प्रभाव सर्व समाजावर पडू शकतो असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.