मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना लोकमतच्या वाचकांचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस - २०१९ ची तिसरी तिमाही) ताज्या अहवालानुसार लोकमत हेच महाराष्ट्राचे निर्विवादपणे पहिल्या क्रमांकाचे मराठी वृत्तपत्र असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकमतची एकूण वाचकसंख्या २ कोटी १८ लाखांहून अधिक आहे. दुसऱ्या क्रमाकांच्या वृत्तपत्रापेक्षा लोकमतचे महाराष्ट्रातील वाचक ७८ लाखांनी म्हणजे ४५ टक्क्यांनी अधिक आहेत. मुंबईतही लोकमत अव्वल स्थानी राहिला आहे.शहरी व ग्रामीण भागांतील वाचकांच्या हृदयावर लोकमत अधिराज्य गाजवत असल्याचे या अहवालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.‘जिथे मराठी तिथे लोकमत’ हे ब्रीद मराठी वाचकांनीच सार्थ ठरविले असून, त्यांच्या हृदयात लोकमतलाच अढळ स्थान असल्याचे अहवालातून दिसून आले आहे.- लोकमतचे 1.33 कोटी वाचक ‘यंग डीसिजन मेकर्स’ (वयोगट 20-49) वर्गातील आहेत. प्रतिस्पर्ध्यापेक्षा ही संख्या 48.81 लाखाने अधिक आहे.- प्रतिस्पर्धी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या वृत्तपत्रापेक्षा लोकमतचे महाराष्ट्रभर 45% अधिक वाचक आहेत.- लोकमत हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे व देशात सहाव्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे.- सधन कुटुंबातील वाचकांच्या संख्येतही लोकमत अग्रस्थानी असून प्रतिस्पर्ध्यापेक्षा दीडपट अधिक (95.45 लाखांच्या तुलनेत 1.43 कोटी) वाचक संख्या आहे.- मुंबई व पुण्यातही लोकमतने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मुंबईत 17.40 लाख तर पुण्यात 21.84 लाख वाचक संख्येसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारतात 2.21 कोटी लोकांचा दिवस लोकमतच्या वाचनाने सुरू होतो.पहिली पसंती ‘लोकमत’चराज्यातील लोकमतच्या शहरनिहाय आवृत्त्यांच्या एकूण वाचकसंख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यात नाशिक (22.33%), मुंबई (10.83%), औरंगाबाद (11.58%) आवृत्त्यांचा समावेश आहे. त्याप्रमाणे सोलापूर, अमरावती व सांगली या शहरांत वाचकांनी पहिली पसंती लोकमतलाच दिली आहे.
एकूण वाचकसंख्यालोकमत- 2.18 कोटीसकाळ- 1.40 कोटीपुण्यनगरी- 1.09 कोटीपुढारी- 92.76 लाखमहाराष्ट्र टाइम्स- 49.43 लाखलोकसत्ता- 47.21 लाखटाइम्स ऑफ इंडिया- 41.35 लाखमहाराष्ट्रातील वाचक : 2.18 कोटी(लोकमत व पुरवण्या)मुंबईत झेप (वाचक संख्येतील वाढ टक्क्यांमध्ये)लोकमत- 10.83सकाळ- 9.08महाराष्ट्र टाइम्स- 5.80लोकसत्ता- 2.96