गणपती उत्सव हा सर्वांचा जिव्हाळ्याचा सण. जिथे जिथे भारतीय आहे तिथे हा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो.
सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे आपण सर्व जण घरातच सण साजरा करत आहोत. तरीही एक नवी उमेद घेऊन लोकमत मीडिया सादर करत आहेत "ग्लोबल सार्वजनिक गणेश उत्सव". या कार्यक्रमात उत्सव, करमणूक आणि प्रार्थना यांचा समावेश आहे.
लोकमत मीडिया विविध संस्थांद्वारे युरोप, अमेरिका, कॅनडा, कॅरिबियन बेटे आणि मध्य पूर्वेतील लोकांबरोबर जोडणार आहे. चिरतरुण प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वेंबरोबर चर्चा आणि गणपती गाण्यातून भक्तिभाव सादर करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या सोबत सामूहिक गणेश आरती म्हणणार आहेत. आपल्या सर्वांचे लाडके लोकगीत गायक नंदेश उमप गणपती गाणी आणि पोवाडा सादर करतील. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपतींचे लाईव्ह दर्शन दाखविण्यात येणार आहे आणि भारतीयांनासुद्धा बाहेरच्या देशातील गणेश दर्शन करता येईल. मुंबईचा राजा म्हणजेच लालबागचा राजा गणपती मंडळ आणि दगडूशेठ गणपती मंडळ अध्यक्षांबरोबर चर्चा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक.
हा कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी 8:00 pm (IST) / सकाळी 10.30 (ET) ला आयोजित करण्यात येत आहे
तुम्ही सहकुटुंब सामिल व्हा आणि भारतातील आणि परदेशातील तुमच्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांनासुद्धा सामील करा.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/lokmatglobalganesha ही लिंक वापरून आपण विश्वभरातील वेग वेगळ्या देशातून एकत्र येउन डिजिटल प्लॅटफॉर्म वर हा उत्सव साजरा करणार आहोत. याचे थेट प्रक्षेपण लोकमत फेसबुक आणि यूट्यूब वाहिन्यांवर उपलब्ध.
(लोकमत आणि सुमा फूडस ह्या कार्यक्रमाचे संयोजक आहेत.)