शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

‘लोकमत’ची भूमिका ठरली ‘लोकचळवळ’

By admin | Published: September 28, 2015 9:32 PM

सातारा : गावोगावी नागरिकांच्या उठावातून डॉल्बीमुक्त विसर्जन

सातारा : लोकहिताबरोबरच लोकभावनेलाही जपण्याचा ‘लोकमत’चा प्रबोधनमार्ग पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता तर्कसुसंगत सुस्पष्ट विचार, ठाम भूमिका, सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि खुली संवादप्रक्रिया अशा टप्प्यांनी ‘डॉल्बीमुक्ती’चा मार्ग मंगलमूर्तींच्या साक्षीने सातारा जिल्ह्यात प्रशस्त झाला आहे. ही लोकचळवळ गावागावात, घरोघरी पोहोचण्यासाठी सर्वांचेच सहकार्य ‘लोकमत’ला लाभले आहे. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक गावांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच डॉल्बी वाजली; तीही एकाच स्पीकरचा वापर करून!गेल्या वर्षी डॉल्बीमुळे भिंत कोसळून साताऱ्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. कर्णकर्कश डॉल्बीमुळे होणारे असे दुष्परिणाम निदर्शनास आणून देतानाच पारंपरिक मिरवणुकीचा थाट अधोरेखित करून ‘लोकमत’ने यावर्षी वाचकांना साद घातली. पहिल्या दिवसापासूनच मिळालेला प्रतिसाद पाहता लोकभावना नेमकी काय आहे, हे सर्वांनाच उमगत गेले. भुर्इंज गावाने डॉल्बीमुक्तीचा श्रीगणेशा ठरावाद्वारे केला आणि अनेक गावे खडबडून जागी झाली. ‘आपल्याही गावात असा क्रांतिकारी निर्णय घ्यायचा,’ असे ठरवून गावागावांत बैठका झाल्या. अशातच तीव्र दुष्काळाची छाया राज्यासह जिल्ह्यावरही पसरली. गणेशोत्सवात पैशांची उधळपट्टी न करता दुष्काळग्रस्तांना हात द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ने केले. पोलीस प्रशासनानेही या चळवळीला सक्रिय पाठबळ देत गावागावात बैठका घेऊन आवाहने केली. शहरासह जिल्ह्यात अनेक ढोलपथके नव्याने स्थापन करून तरुणांनी कसून सराव सुरू केला.डॉल्बीला परवानगीवरून कोर्टकचेऱ्या झाल्या; मात्र तोपर्यंत नागरिकांचा निर्णय पक्का झाला होता. शेवटच्या टप्प्यात ‘लोकमत’च्या कार्यालयात परिचर्चा घेण्यात आली. डॉल्बीमालकांच्या प्रतिनिधीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी, विधीज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, महिला प्रतिनिधी, मंडळांचा प्रतिनिधी, ढोलपथकांचा प्रतिनिधी असे दहा समाजघटक ‘लोकमत’ने एका टेबलवर आणले. यावेळी झालेल्या चर्चेच्या वार्तांकनातून डॉल्बीच्या सर्वच अंगांवर प्रकाशझोत पडला. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन नागरिकांनी शिस्तबद्धतेत आनंद शोधला आणि त्यांना तो भरभरून मिळालाही! (प्रतिनिधी)‘लोकमत’ ने सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला. यामुळे वाचकांमध्येच एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली. सार्वजनिक गणेश मंडळे व जनता यांनीच स्वत:हून या चळवळीला साथ दिली. त्यामुळे प्रशासनाचे काम सोपे झाले. जनतेला सुखाने राहता आलं पाहिजे, ही जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. सातारा शहरातील २५ तर संपूर्ण जिल्ह्यातील १00 क्षेत्रे शांतता क्षेत्र म्हणून आम्ही जाहीर केली होती. यातून ४00 ते ५00 डेसिबलपर्यंत जाणारे ध्वनीचे आवाज कमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेने अत्यंत चांगले काम केले. - अश्विन मुदगल, जिल्हाधिकारीचार स्पीकर, दोन ‘बास’साताऱ्यातील मिरवणुकीत डॉल्बी अभावानेच दिसत होती. मुख्य मिरवणुकीत ज्यांनी डॉल्बीचा वापर केला, त्या मंडळांनीही केवळ चार स्पीकर आणि दोन ‘बास’ किंवा ‘बेस’चा वापर केला. त्यामुळे डॉल्बीचा आवाज आपोआपच मर्यादित राहिला. मुख्य मिरवणुकीतून डॉल्बीच्या भिंती गायब होऊन जास्तीत जास्त सात स्पीकर पाहायला मिळाले.