मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द इयर (वीज) हा पुरस्कार पुण्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या ठिकेकरवाडी गावचे सरपंच संजयकुमार विलासराव कोतकर यांना देण्यात आला.
गट - वीजसरपंचाचे नाव - संतोष दगडू ठिकेकरगाव - ठिकेकरवाडीतालुका - जुन्नरजिल्हा - पुणे
संतोष ठिकेकर यांची कामगिरी....
ठिकेकरवाडी या गावचे सरपंच संतोष दगडू ठिकेकर यांनी २००० सालापासून गावाच्या सामाजिक कार्यात हिरिरिने भाग घ्यायला सुरुवात केली. २००७ साली हे गाव निर्मल ग्राम करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. २०१० ते २०१५ व २०१५ ते २०२० या कालावधीसाठी संतोष ठिकेकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. गावात इतर पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच वीजपुरवठा याबाबत उत्तम कामझालेले आहे. पारंपारिक उर्जा स्रोतांना जरा बाजूला ठेवून अपारंपारिक ऊर्जास्रोतांच्या सहाय्याने वीजनिर्मिती करत गावात सर्व मळ््यांमध्ये व अन्य सार्वजनिक ठिकाणी सौरपथदिवे बसविण्यात आले आहेत. २०११-१२ या वर्षात १ किलोवॅट क्षमतेचे पवन व सौरऊर्जा प्रकल्प राबवून त्याद्वारे ग्रामपंचायतीला कॉम्प्युटर, बल्ब, फॅन यांच्याकरिता वीजपुरवठा केला जातो. या प्रकल्पातूनच रात्रीच्यावेळी १० स्ट्रीट लाइटना वीजपुरवठा केला जातो. अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी ठिकेकरवाडी ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या गावातील ग्रामपंचायत कार्यालय अपारंपारिक उर्जास्रोतांतून वीजनिर्मिती करुन वीजेबाबत स्वयंपूर्ण केले आहे. सदर प्रकल्पास राज्य व केंद्र सरकारने पथदर्शी प्रकल्प म्हणून मान्यता दिली. ग्रामपंचायतीकडून चालविण्यात येणाऱ्या खतनिर्मिती शेडच्या पत्र्यावर सातकिलोवॅट क्षमतेचा रुप टॉप सोलार पॉवर प्लांट बसविण्यात आला आहे. घनकच-याद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे १५ किलोवॅट वीजनिर्मिती गावात करण्यात येते. त्याद्वारे घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारी वीजनिर्मिती करुन येथील मशिनरी चालविली जाते. संपूर्ण गावामध्ये अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी वायरचे जाळे विणण्यात आले असून त्यातून वीजपुरवठा होतो. गावातील प्रत्येक कुटुंबासाठी सोलर वॉटर हिटरबसविणे हा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता. त्यानूसार गावातील ८० टक्के कुटुंबांच्या घरात सोलर वॉटर हिटर बसविले आहेत व उरलेल्या घरांमध्ये हे काम प्रगतीपथावर आहे. ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष दगडू ठिकेकर हे शासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील काही कार्यशाळा व कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे त्यांनी ठिकेकरवाडीतील वीजनिर्मिती व पुरवठा तसेच इतर पायाभूत सुविधांच्या विकासाची कहाणी सादर करुन सर्वांना प्रेरित केले आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.